Maharashtra Cabinet Expansion Ajit Pawar NCP also wants ministry that Shinde group wants political crisis Saam TV
मुंबई/पुणे

Cabinet Expansion: शिंदे गटाचं टेन्शन वाढवणारी बातमी, मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर? समोर आली मोठी कारणं...

Maharashtra Political News: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. युती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Cabinet Expansion: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. युती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.  अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाकडून चांगल्या खात्याची मागणी केली जात असल्याने भाजपसह शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजीचा सूर असल्याची माहिती आहे. त्यामुळे आधी खातेवाटपाबाबत चर्चा केली जाईल आणि नंतरच मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) लांबवणीवर पडणार असल्याचं लक्षात येताच शिंदे गटातील भावी मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे. गेल्या वर्षभरापासून युती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराविषयी चर्चा सुरू आहे. एकीकडे शिंदे गट आणि भाजपमधील आमदार मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत असताना दुसरीकडे अचानक अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

अजित पवार यांच्या एन्ट्रीमुळे युती सरकार आणखीच मजबूत झालं. मात्र, यावरून शिंदे गटात प्रचंड नाराजी असल्याच्या चर्चा सुरू आहे. काहीही करा पण अजित पवार यांना अर्थ खातं देऊ नका, अशी भूमिका शिंदे गटातील (Eknath Shinde) नेत्यांनी मांडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्यासह युती सरकारमध्ये सामील झालेले राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी आतापर्यंत मोठमोठी मंत्रिपदं भूषवलेली आहे.

त्यामुळे त्यांना साजेसे मंत्री पद मिळावं, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदासाठीही आग्रही मागणी आहे. याला भाजपच्या आमदारांनी सुद्धा विरोध केल्याचं सांगितलं जात आहे. सध्या तिन्ही नेते आपआपल्या आमदारांची समजूत काढत असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सोमवारी रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत खाते वाटपावर प्रदीर्घ चर्चा झाली. या बैठकीत तिन्ही नेत्यांनी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कसे खाते वाटप करायचे याचा फॉर्म्यूला ठरवला आहे. मात्र, आता हा फॉर्म्यूला शिंदे गटातील काही आमदारांना मान्य नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: बात निकली है, तो बहोत दूर तक जाएगी; छगन भुजबळ यांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

PM Modi: महाराष्ट्रातील निवडणुकीत कर्नाटकातील घोटाळ्यांच्या पैशांचा वापर, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

News Explainer : राजकारणातून काकांचे निवृतीचे संकेत, पुतण्याने हेरली संधी? VIDEO

Raj Thackeray: भविष्यातल्या महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो; चांदीवलीत राज ठाकरे असं का म्हणाले?

Maharashtra Politics : राज्यातील 40-42 मतदारसंघात अमराठींचा बोलबाला; परप्रांतीय मतं कोणाचं टेन्शन वाढवणार? वाचा

SCROLL FOR NEXT