Anil Deshmukh Saam TV
मुंबई/पुणे

Anil Deshmukh: अनिल देशमख यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; जामिनाचा मार्ग मोकळा, सीबीआयची याचिका फेटाळली

मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयची याचिका फेटाळली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमख यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयची याचिका फेटाळली आहे.

अनिल देशमुखांच्या जामिनाविरोधात सीबीआयने हायकोर्टात धाव घेतली होती. अनिल देशमुख यांना 12 डिसेंबरला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर सीबीआयने हायकोर्टात  (Mumbai High Court)  धाव घेतल दहा दिवसांची स्थगितीची विनंती केली होती.

न्यायालयाने ती विनंती मान्य केली. ती मुदत संपत असताना सीबीआयने पुन्हा एकदा 27 डिसेंबरपर्यंत मुदत वाढ मिळावी अशी विनंती केली होती. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी सीबीआयची ही विनंती स्वीकारली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांचा जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयात अपिलासाठी दिलेला कालावधी आज संपला होता. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना सीबीआयला सर्वोच्च न्यायालयात अपिल करण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी दिला होता. तो कालावधी आज 27 डिसेंबरला संपला.

सर्वोच्च न्यायालयाला सध्या नाताळाच्या सुट्ट्या असल्यानं अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे आज अनिल देशमुख यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान आज जर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला तर नागपूर इथं सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात अनिल देशमुख सहभागी होण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. (Tajya News)

अँटेलिया स्फोटक प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझे या पोलिस कर्मचाऱ्याने अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपानंतर गृहमंत्री पदावर असलेल्या अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून ते या प्रकरणात अटकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Mall threat : पुण्यातील मॉल उडवून देण्याची धमकी, तो मेल कोणी केला?

Pune BJP : भाजपचा स्थापना दिवस अन् अनधिकृत फ्लेक्सची बजबजपुरी, पुणे महापालिका कारवाई करणार?

Kalyan Tourism : कल्ला मस्ती ऑन द वे! वीकेंडला फिरा 'कल्याण'जवळील 'हे' पिकनिक स्पॉट्स, प्लान करा Summer ट्रिप

राजकारणात बदलाचे संकेत! २८८ नव्हे तर असतील ३५० आमदार; ५४४ ऐवजी असणार ६५० खासदार,MP, MLAची संख्या वाढणार?

Maharashtra News Live Update: नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील भोंदू अशोक खरात यांच्या कार्यालयात पुन्हा एसआयटीच पथक दाखल

SCROLL FOR NEXT