Bombay High Court dismisses case kalyan police filed against Raj Thackeray saam tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा दिलासा, मुंबई हायकोर्टाकडून तो गुन्हा रद्द

Raj Thackeray Latest News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे.

Satish Daud

Raj Thackeray Latest News

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कल्याण पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा हायकोर्टाने रद्द केला आहे. २०१० साली राज ठाकरे यांच्यावर कल्याण पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली होती. ही नोटीस न स्वीकारल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याच प्रकरणी साल २०११ मध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कल्याण कोर्टात हजेरी लावत जामीन मिळवला होता. याविरोधात राज ठाकरे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. राज ठाकरे यांच्या वतीने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

१५ ऑक्टोबरला न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर अंतिम सुनावणी झाली होती. त्यावेळी कोर्टाने निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान मुंबई हायकोर्ट याबाबत काय निर्णय देणार? याकडे संपूर्ण मनसैनिकांचे लक्ष लागून होते.

राज ठाकरेंना मिळणार का दिलासा? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात होता. आज हायकोर्टाने यावर निकाल देताना कल्याण पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द केला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, राज ठाकरे यांना दिलासा मिळताच मनसैनिकांनी आनंद साजरा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AI TECH : लवकरच बाजारात येणार ChatGPT-पावर्ड स्मार्ट स्पीकर , AI Assistant ची लुटता येणार मज्जा

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

SCROLL FOR NEXT