Hasan Mushrif News saam tv
मुंबई/पुणे

Hasan Mushrif News : हसन मुश्रीफ यांना मोठा दिलासा, तूर्तास अटक टळली; कोर्टाचे आदेश काय?

Hasan Mushrif News : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे.

Satish Daud

Hasan Mushrif News : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. पुढील दोन आठवडे मुश्रीफ यांना अटक करू नये, असे आदेशच कोर्टाने दिला आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्यावरील अटकेची टांगती तलवार दोन आठवड्यापुरती दूर झाली आहे. (Latest Marathi News)

हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कागल येथील घरावर ईडीने छापेमारी केली होती. गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी छापेमारी होती. त्यामुळे मुश्रीफ यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यानंतर मुश्रीफ यांनी कोर्टात धाव घेतली होती. आज मुंबई हायकोर्टात मुश्रीफ यांच्या याचिकेवर सुनावणी झाली.

पुढील दोन आठवडे हसन मुश्रीफ यांना अटक न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला दिले आहेत. हसन मुश्रीफ यांनी मुंबई सत्र न्यायालयात रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करावा, असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत. (Maharashtra Political News)

आमदार मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, ब्रिक्स कंपनीतील व्यवहारावरून ‘ईडी’ च्या चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला आहे. शनिवारी सकाळी दहा गाड्यांतून सुमारे २४ जणांचे पथक कोल्हापुरात दाखल झाले होते. त्यापैकी बारा जणांनी मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी छापा टाकला. दुपारी साडेबारापर्यंत ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर त्यातील सहा जण तेथून निघून गेले.

शनिवारी सकाळी त्यांच्या कागल मधील निवासस्थानी ईडीच्या (Ed Action) पथकाने तिसऱ्यांदा छापा टाकला. तेव्हापासून आमदार मुश्रीफ हे नॉट रिचेबल होते. सोमवारी त्यांना ईडीने मुंबई कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले होते. यानंतर हसन मुश्रीफ यांना अटक होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, त्यांना तुर्तास दोन आठवडे अटकेपासून दिला मिळाला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत FDA ची ‘एन्ट्री’

Accident News : रक्षाबंधन अखेरचं ठरलं! दुचाकीवरून जाणाऱ्या कुटुंबातील ४ जणांना ट्रकने उडवलं; बहीण भावाचा जागीच मृत्यू

September Rule Changes: दुधापासून ते LPG सिलिंडरपर्यंत... १ सप्टेंबरपासून बदणार हे ९ नियम; सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार परिणाम

Crime : प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या समर्थकाला संपवलं, घराजवळच भयंकर हल्ला; शहरात प्रचंड खळबळ

Krishna Janmashtami 2026 : 4 की 5 सप्टेंबर? यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त

SCROLL FOR NEXT