Eknath shinde and Devendra Fadnavis  saam tv
मुंबई/पुणे

ठरलं! सरपंचांची निवड थेट जनतेतूनच होणार; विधानसभेत विधेयक मंजूर

आता सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार यावर शिक्कामोर्तब झालंय.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aaghadi) घेतलेल्या अनेक निर्णयास स्थगिती देण्यास सुरूवात केली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज पुन्हा एकदा शिंदे सरकारने (Eknath Shinde) मविआला मोठा धक्का दिला. राज्यातील सरपंचाची निवड आता थेट जनतेतून होणार असून याबाबतचं विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आलं आहे. त्यामुळे आता सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार यावर शिक्कामोर्तब झालंय. (Eknath Shinde Latest News)

देवेंद्र फडणवीस हे २०१६ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यात सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. मविआ सरकारनं राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये थेट जनतेतून सरपंच निवडीच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांननी हा निर्णय रद्द केला. परंतु राज्यात पुन्हा सत्ताबदल झाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारनं याबाबत घेतलेला निर्णय रद्द करत सरपंचांची थेट जनतेतून निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. (Devendra Fadnavis Latest News)

राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांनी अधिवेशन सुरू होताच, विधानसभेत याबाबतचं विधेयक मांडलं होतं. या विधेयकाला बहुमतानं पारीत करण्यात आलं आहे. त्यामुळं आता राज्यात यापुढे सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार आहे. याशिवाय महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्येही शिंदे सरकारकडून सुधारणा करण्यात आल्या आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madhuri Dixit: धकधक गर्लसाठी आईने निवडला होता हा गायक नवरा; पण लग्न झालं डॉ. नेनेंसोबत

Maharashtra News Live Update: साम टीव्हीच्या बातमीचा दणका; अन्न व औषध प्रशासनाचे शिर्डीत धाडसत्र

Shocking: खेळताना चक्कर आली अन् खाली पडली, १४ वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Latur : सांभाळ करेन म्हणून नातवाच्या नावावर ७.५ एकर जमीन केली, उतार वयात लक्षच देईना; आजीने इंगाच दाखवला

खुशखबर! 50000 विद्यार्थांना मोफट स्कूटी मिळणार, काय आहे राणी लक्ष्मीबाई योजना?

SCROLL FOR NEXT