Pune Sunil Mane News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Politics News: पुण्यात भाजपला मोठा धक्का, गिरीष बापट यांचे निकटवर्तीय शरद पवारांच्या गळाला

Pune Sunil Mane News: लोकसभा निवडणुकीपूर्वी पुणे शहरात भाजपला मोठा धक्का बसला आहे. दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे निकटवर्तीय सुनील माने यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.

Satish Daud

Pune Breaking News

लोकसभा निवडणुकीपूर्वी पुणे शहरात भाजपला मोठा धक्का बसला आहे. दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे निकटवर्तीय सुनील माने यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. लवकरच ते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. पुण्यातील मोदी बागेत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजपचे कट्टर कार्यकर्ते म्हणून सुनील माने यांना ओळखले जात होते. दिवंगत खासदार गिरीष बापट यांचे निकटवर्तीय असलेल्या माने यांना राजकारणाचा चांगलाच अनुभव आहे. गिरीष बापट खासदार असताना त्यांनी सर्वसामान्यांची कामे करत मतदारांचं लक्ष आपल्याकडे खेचून घेतलं होतं. (Breaking Marathi News)

शिवाजीनगर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्यास माने इच्छुक होते. मात्र, पक्षाने त्यांना तिकीट नाकारले. याच नाराजीतून त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. आज ते शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षात प्रवेश करणार आहेत. (Lok Sabha Election 2024)

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. माने यांच्या पक्षप्रवेशामुळे पुण्यात शरद पवार यांच्या पक्षाची ताकद वाढणार आहे. त्यामुळे शरद पवार गटाकडून माने यांना पुणे लोकसभेचं तिकीट मिळणार का? हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: 'सहाव्यांदा दक्षिण पश्चिमची जनता आशीर्वाद देणार..' देवेंद्र फडणवीसांना विश्वास

Camphor Benefits: घरात कापूर पाणी शिंपडल्याने होतात अनेक फायदे!

Aus vs Tasmania: ऐकावं ते नवल! १ धाव अन् ८ फलंदाज तंबूत; ७ फलंदाज तर शून्यावर बाद

Milid Devra News : वरळीत ठाकरे Vs देशपांडे Vs देवरा सामना रंगणार ?

Vastu Shastra : घरात या गोष्टी घडणे म्हणजे सुख, शांती आणि समृद्धीचे संकेत

SCROLL FOR NEXT