Mumbai Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: नवी मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई, एक कोटी रुपये किंमतीचे ड्रग्स जप्त

कारवाईत एक कोटी रुपये किंमतीचे ड्रग्स आणि गांजा जप्त करण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सिद्धेश म्हात्रे

Mumbai Crime News: नवी मुंबईतील खारघरमध्ये क्राईम ब्रांचने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एक कोटी रुपये किंमतीचे ड्रग्स आणि गांजा जप्त करण्यात आला आहे. नवी मुंबई क्राइम ब्रांचला खारघरमधील एका इमारतीमध्ये ड्रग्स आणि गांजाची पार्टी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली. (Latest Crime News)

प्राप्त माहितीनुसार, नवी मुंबई क्राइम ब्रांचने या इमारतीवर छापा मारत त्याठिकाणी उपस्थित 6 महिला आणि 10 पुरुषांना अटक केली आहे. हे सर्व नायजेरियन नागरिक आहेत. आज नवीन वर्षा निमित्त जंगी पार्टी करण्याचे नियोजन आखण्यात आले होते. मात्र त्याआधीच पोलीसांना माहिती मिळाल्याने नवी मुंबई गुन्हे शाखेने तेथे उपस्थित 16 नायजेरियन नागरिकांना अटक करत त्यांच्याकडील 1 कोटी रुपये किंमतीचे ड्रग्स जप्त केलेत.

नवीन वर्षाचे आगमन होत असताना सर्वत्र जल्लोष पाहायला मिळत आहे. अशात काही व्यक्ती अंमली पदार्थांचे सेवन करत २०२२ चा निरोप घेण्याच्या तयारीत आहेत. अशा सर्वांवरच मुंबई पोलिसांची बारीक नजर आहे. मुंबईत अनेक ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून छापेमारी सुरू आहे. अशात आज खारघरमध्ये अशाच पार्टीचे आयोजन करण्यात आले होती. मात्र पोलिसांनी ही पार्टी उधळून लावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या लग्नात विघ्न; वडिलांच्या पाठोपाठ होणाऱ्या नवऱ्याची प्रकृती बिघडली

BMC Election : महापालिकेची ही शेवटची निवडणूक, हातातून मुंबई गेली तर...; राज ठाकरे स्पष्टच बोलले, VIDEO

Sangli Accident : सांगलीत भीषण अपघात; मद्यधुंद कार चालकाने ४-५ वाहनांना उडवलं, परिसरात खळबळ

लवकरच सीमा बदलणार, सिंध मिळणार; विना लढाईचं PoK येणार भारतात: संरक्षण मंत्री

प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर; घरातील जवळच्या व्यक्तीचं निधन

SCROLL FOR NEXT