भोर पंचायत समितीच्या सभापतींसह दोन सदस्यांचे पद रद्द; राजकीय वर्तुळात चर्चा Saam TV
मुंबई/पुणे

भोर पंचायत समितीच्या सभापतींसह दोन सदस्यांचे पद रद्द; राजकीय वर्तुळात चर्चा

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाहिल्यांदाज पक्षाचे व्हीप डावल्याने कारवाई केली गेली आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे: पक्षाचा व्हीप डावलल्यानं भोर पंचायत समितीच्या सभापती सह दोन सदस्यांचे पद रद्द करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाहिल्यांदाज पक्षाचे व्हीप डावल्याने कारवाई केली गेली आहे. सभापती दमयंती जाधव तसेच पंचायत समिती सदस्य श्रीधर रघुनाथ किंद्रे व मंगल सोपान बोडके या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन सदस्यांचे सदस्यत्व जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सदस्यत्व रद्द केल्याचे आदेश काढले आहेत. पंचायत समितीच्या सभापती निवडीवेळी पक्षाने बजावलेल्या व्हीपचे पालन न केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केले होते. भोर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ४ आणि शिवसेना व काँग्रेस पक्षाचा प्रत्येकी १ सदस्य आहे.

दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी सभापतींसह अन्य दोन सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. जिल्हाधिकारी डॅा. राजेश देशमुख यांनी मंगळवारी (दि. १४ ) या बाबत आदेश दिले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. भोर पंचायत समितीचा कारभार आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उपसभापती लहूनाना शेलार हेच पाहतील असे ही त्यांनी सांगितले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MP Disqualification: आता सुप्रीम कोर्टात लागणार बंडखोर खासदारांचा निकाल; २० खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Chandrapur Firing: न्यायालयासमोरच गोळीबार! नाराळपाणी दुकानावर उभ्या असलेल्या तरुणावर धाडधाड झाडल्या गोळ्या

साखरेचे दर शंभरी पार जाणार? ऐन सणासुदीत साखर क़डू

नागपूरमध्ये क्लोरीन वायूची गळती, 40 जणांवर उपचार, 5 गंभीर, जलशुद्धीकरण प्रकल्प भरवस्तीत कसा?

कचोरी आणि बिर्याणीत उंदरांच्या लेंड्या, किळसवाण्या प्रकारामुळे नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT