pune news 
मुंबई/पुणे

Pune : आई गेली, पिल्लूही गेलं... पण तिसरं माकड २४ तासानंतरही तिथेच, ह्रदय पिळवटणारी घटना

Bhima-Koregaon: Heartbreaking : भीमा-कोरेगाव येथे एका माकडीण व तिच्या पिल्लाचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहाजवळ बसलेले तिसरे माकड दुःख व्यक्त करत, माणुसकीचा आरसा ठरले. ही कथा प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून जाते.

Namdeo Kumbhar

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

Pune Koregaon Bhima News : कोरेगाव भीमा येथे गेल्या काही दिवसांपासून एक माकडीण, तिचे पिल्लू आणि त्यांच्यासोबत असलेले आणखी एक माकड परिसरात फिरताना दिसत होते. आई, तिचे बाळ आणि त्यांचा एक रक्षक मित्र! ही तिघांची अनोखी जोडी गावकऱ्यांच्या नजरेस पडली होती.

पण रविवारी एका हृदयद्रावक घटनेने ही तिघांची साथ कायमची तुटली. चिमुकल्या पिल्लाचा अपघाती मृत्यू झाला आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात माकडीणही मृत्यूमुखी पडली. या दोघांच्या मृतदेहाजवळ तिसरे माकड कालपासून शांतपणे, हालचाल न करता बसले आहे. न अश्रू, न शब्द... फक्त शून्यात हरवलेली नजर.

हे दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी तरळले. भावना फक्त माणसांपुरत्या मर्यादित असतात, असे कोण म्हणते? या माकडाच्या वागणुकीने माणुसकीला खरेच आरसा दाखवला. वन्यजीवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेत मृत माकडांचे मृतदेह ताब्यात घेऊन वनविभागाकडे सुपूर्द केले. पण या घटनेने एक गहन प्रश्न उपस्थित केला आहे—आपल्या सभ्य समाजात खरंच संवेदनशीलता शिल्लक आहे का? माकडीण गेली, पिल्लू गेले... पण तिसरे माकड अजूनही तिथेच आहे. कुणासाठी? प्रेमासाठी? आठवणींसाठी? की आपल्याला माणुसकीचा धडा शिकवण्यासाठी...?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

Shocking : लव्ह मॅरेजनंतर ४ महिन्यांनी जवानाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट केला शेवटचा व्हिडिओ

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

SCROLL FOR NEXT