Bhayandar News Saamtv
मुंबई/पुणे

Bhayandar News: पाण्याचा अंदाज न आल्याने घडला अनर्थ! भाईंदर पश्चिमेच्या खाडीत MSFचा कर्मचारी बुडाला; शोधकार्य सुरू

भाईंदर पोलीस आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान त्याचा शोध घेत आहेत

चेतन इंगळे

Bhayandar News: भाईंदरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाईंदर पश्चिमेकडे खाडीजवळ एमएसएफ चा एक जवान बुडाल्याची दुर्घटना घडली आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाल्याचे सांगण्यात येत असून मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान त्याचा शोध घेत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, भाईंदर पश्चिमेकडे खाडीजवळ एम एस एफचा रमेश पाटील हा जवान कपडे काढून पाण्यात उतरला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. भाईंदर पोलीस आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दुपारी तीनच्या सुमारास रमेश पाटील कपडे काढून आंघोळीसाठी पाण्यात उतरला होता. त्यावेळी पाण्याचा अंदाज चुकल्याने तो पाण्यात बुडाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, आज सकाळीच  मुंबईतील वांद्रे येथे एक महिला समुद्राच्या पाण्यात बुडाल्याची घटना घडली होती. तसेच मालाडच्या मार्वे समुद्रात पाच मुले समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. समुद्रात बुडालेल्या दोघांना वाचविण्यात यश आलं आहे. तर तिघांचा शोध सुरू आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

SCROLL FOR NEXT