bhaubeej 2023 general motors workers strike in talegaon midc  saam tv
मुंबई/पुणे

Talegoan MIDC : जनरल मोटर्सच्या कामगारांचा परिवार आक्रमक, काळ्या साड्या नेसून मंत्र्यास दिल्या भाऊबीजेच्या शुभेच्छा

आंदाेलकांनी काळा कंदील लावून सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा जाहीर निषेध नुकताच केला हाेता.

दिलीप कांबळे

Maval News : 

मावळ येथील तळेगाव दाभाडे एमआयडीसी मधील बंद पडलेल्या जनरल मोटर्सचे कामगार आणि त्यांचे कुटुंबियांनी ऐन दिवाळी सणात अनाेख्या पद्धतीचे आंदाेलन छेडेले. जनरल मोटर्स कंपनी व राज्य सरकार यांच्याकडून होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आज जनरल मोटर्सच्या कामगारांच्या परिवारातील महिलांनी काळ्या साड्या नेसून प्रतिनिधिक स्वरूपात कामगार मंत्री सुरेश खाडे (Suresh Khade) यांच्या प्रतिमेला भाऊबीज ओवाळून निषेध नाेंदविला. (Maharashtra News)

मावळातील (maval) तळेगांव जनरल मोटर्सच्या कामगारांचे आंदोलन हे गेली पंचेचाळीस दिवसांपासून सुरू आहे. तब्बल एक हजार कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. दीड महिन्यापासून कामगारांचा परिवार उपोषण करत आहे.

या आंदाेलकांना दसरा आणि दिवाळी हे दाेन्ही सण रस्त्यावर बसूनच काढावे लागले. दरम्यान आज कामगारांच्या परिवारातील महिलांनी काळ्या साड्या नेसून प्रतिनिधिक स्वरूपात कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या प्रतिमेला भाऊबीज ओवाळून एक हजार कामगारांच्या नोकऱ्या वाचाव्यात हीच ओवाळणी आम्हाला द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या कामगारांच्या परिवाराची दिवाळी शिंदे सरकारने काळी केली ती निषेधार्थ उपोषणस्थळी कामगारांनी मुंडन करून काळा कंदील लावून सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा जाहीर निषेध करण्यात आला होता.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरीक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT