Bhaskar Jadhav News  Saam TV
मुंबई/पुणे

Bhaskar Jadhav : राणे कुटुंबीयांवरती टीका केल्यामुळे भास्कर जाधव अडचणीत; पुण्यात गुन्हा दाखल

काही दिवसांपासून आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि राणे कुटुंबीयांमध्ये शाब्दीक चकमक सुरु आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासह त्यांच्या मुलांवरती टीका करताना आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर पुण्यातील डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि राणे कुटुंबीयांमध्ये शाब्दीक चकमक सुरु आहे. अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करताना जाधव यांनी आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यांच्या याच वक्तव्यामुळे ते अडचणीत आले आहेत.

पाहा व्हिडीओ -

मात्र, आता जाधव यांच्या हे आक्षेपार्ह वक्तव्य करणं चांगलंच अंगलट आलं आहे. पुण्यातील डेक्कन पोलिसांमध्ये योगेश अरुण शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जाधव यांच्या विरोधात ५००, ५०१, आणि ५०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भास्कर जाधव यांनी केलेलं वक्तव्य राणेंच्या चांगलेच जिव्हारी लागलं असून त्याचे पडसाद देखील आता पाहायला मिळतं आहेत. मंगळवारी रात्री काही अज्ञातांनी जाधव यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्या आधीच जाधव यांची सुरक्षा काढून घेतल्याची माहिती देखील समोर आली होती. त्यामुळे राणे विरुद्ध ठाकरेंची शिवसेना यांच्यातील संघर्ष पु्न्हा पेटण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

माणिकराव कोकाटेंना जेल की बेल, फैसला कधी? न्यायमूर्तींनी एका वाक्यात सांगितलं | VIDEO

SCROLL FOR NEXT