Accident Saam tv
मुंबई/पुणे

BEST bus Accident: भरधाव बेस्ट बसने शाळकरी मुलाला उडवले, चिमुकल्याचा मृत्यू

Bandra Accident : वांद्रे येथे मंगळवारी बेस्ट बसने १२ वर्षाच्या मुलाला उडवले, यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

Namdeo Kumbhar

Bandra Accident News : शाळा सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना वांद्रे येथे घडली आहे. सहावीत शिकणारा अरबाज अन्सारी वांद्रे येथे रस्ता ओलांडत असताना भरधाव येणाऱ्या बेस्ट बसने उडवले. त्यामध्ये त्याचा मृत्यू झालाय. याप्रकरणी बेस्ट बस चालक विजय बागल याच्यावर गुन्हा दाखळ करण्यात आला आलाय. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. आज त्याला वांद्रे येथील कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

वांद्रे येथील भरधाव बेस्ट बस अपघातात बारा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. मंगळवारी ही घटना घटना घडली. सहावीत शिकणारा अरबाज अन्सारी शाळेतून घरी जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या बेस्ट बसने उडवले. याप्रकरणी बेस्ट बस ड्रायव्हर विजय बागल यांच्यावर कलम 106 281 नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीला आज वांद्रे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. १२ वर्षाच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर वांद्रे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

खेरवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ वर्षीय अन्सारी कार्डिनल ग्रेसियस हायस्कूलमधून घराकडे निघाला होता. वाल्मिकी नगर येथील घराकडे निघाला होता. मित्रांसोबत रोड क्रॉस करत असताना भरधाव आलेल्या बसने अन्सारी या १२ वर्षाच्या मुलाला उडवले. सकाळी दहा वाजताच्या आसपास ही घटना घडली. याप्रकरणी बेस्ट बस चालक विजय बागल (४५) याला पोलिसांनी अटक केली आहे.

खेरवाडी पोलीस ठाण्याजवळील शासकीय कॉलनी मैदानाजवळ हा अपघात झाला. बेस्टची बस (0599) वांद्रे डेपोतून वांद्रे रेक्लेमेशन येथून टाटा कॉलनी (वांद्रे) येथे जात असताना हा अपघात झाला. या अपघातानंतर बस चालक बागल आणि बेस्ट बसला पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले. या घटनेनंतर बेस्टमधील प्रवाशांना खाली उतरवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अन्सारी शाळेच्या आयकार्डवरील मोबाइल क्रमांकाच्या आधारावर एका व्यक्तीने वडिलांना माहिती दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT