Kalyan News Saam TV
मुंबई/पुणे

Kalyan News : दंड आकारल्याने रिक्षा चालक वाहतूक पोलिसांशी भररस्त्यात भिडला; कल्याणमधील खळबळजनक घटना

Argument Between Rickshaw Driver and Traffic Police : वाहतूक पोलीस आणि रिक्षा चालकामध्ये वाद सुरू झाला. रिक्षा चालक आणि वाहतूक पोलीस आपसात भिडले. भर रस्त्यात हा गोंधळ सुरू झाला या ठिकाणी नागरीकांची एकच गर्दी झाली होती.

साम टिव्ही ब्युरो

कल्याण अभिजित देशमुख

kalyan News :

वाहतुकीचे नियम न पाळल्यास त्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केले जाते. मात्र कल्याणमध्ये वाहतूक पोलिसाने दंडात्मक कारवाई केल्यानंतर त्यांना त्रास देण्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार,कल्याण पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नो पार्किंगमध्ये एक रिक्षा उभी होती. वाहतूक पोलिसांनी यासाठी रिक्षा चालकावर दंडात्मक कारवाई केली आणि तेथून दुसरीकडे गेले. पुढे काही क्षणातच रिक्षा चालकाने वाहतूक पोलिसाला गाठले.

त्यानंतर वाहतूक पोलीस आणि रिक्षा चालकामध्ये वाद सुरू झाला. रिक्षा चालक आणि वाहतूक पोलीस आपसात भिडले. भर रस्त्यात हा गोंधळ सुरू झाला या ठिकाणी नागरीकांची एकच गर्दी झाली होती.

कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून या परिसरात नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांवर सतत कारवाई केली जाते. या कारवाईमुळे अनेकदा नागरिक व वाहतूक पोलिसांमध्ये वाद झाले आहेत.

आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका रिक्षा चालकाची रिक्षा नो पार्किंग झोनमध्ये उभी होती. वाहतूक पोलिसांनी या रिक्षाला दंड आकारला व वाहतूक पोलिसांची गाडी पुढे जाताच या रिक्षा चालकाने वाहतूक पोलिसांची गाडी अडवली. वाहतूक पोलीस कर्मचारी रोहिदास गावित यांच्यासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

या दोघांमध्ये वाद झाला, भर रस्त्यात हा गोंधळ सुरू होता. अखेर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी केली. त्यानंतर वाहतूक पोलीस कर्मचारी रोहिदास गावित यांनी मी दंड आकारल्याने रिक्षा चालक माझ्याशी हुज्जत घालत असल्याचे सांगितले. रस्त्यात वाहतूक पोलीस व रिक्षा चालकांमध्ये सुरू असलेला या गोंधळामुळे या ठिकाणी नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT