बीड: सभागृहात लक्षवेधी मांडणाऱ्या आमदारांच्या बगलबच्चांचेच अवैध धंदे- शिवसेना नेत्याचा आरोप विनोद जिरे
मुंबई/पुणे

बीड: सभागृहात लक्षवेधी मांडणाऱ्या आमदारांच्या बगलबच्चांचेच अवैध धंदे- शिवसेना नेत्याचा आरोप

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांसह मुख्यमंत्र्यांकडे केली लेखी तक्रार.

विनोद जिरे

विनोद जिरे

बीड: बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे वरून आता जिल्ह्यातील नेत्यांमध्ये चांगल्याच आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडत राजकारण तापलं आहे. तर याच जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (MLA Sandeep Kshirsagar) यांनी, जिल्ह्यात मटका, जुगार, वेश्याव्यवसाय सावकारकी कशा स्वरुपात चालू आहेत, हे सांगितलं होतं. या त्यांच्या लक्षवेधीवर आता शिवसेना (Shivsena) माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी गंभीर आरोप केले असून वरिष्ठांकडे तक्रार देखील केलीय.

यावेळी सचिन मुळूक म्हणाले की, आमदार संदीप क्षीरसागर यांनी विधानसभेच्या सभागृहात लक्षवेधी मांडली. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सांगितला. मात्र संदीप क्षीरसागर यांनी जे सांगितलं, त्यातील मटका, जुगार, सट्टा, सावकारकी हे सर्व चालवणारे जे लोक आहेत, ते संदीप क्षीरसागर यांचेचं कट्टर कार्यकर्ते, समर्थक आहेत. आणि त्यांच्याच आशीर्वादाने हा सर्व धंदा सुरू आहे. असा गंभीर आरोप सचिन मुळूक यांनी केलाय. तर याच विषयी सचिन मुळूक यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी तक्रार देखील केलीय.

हे देखील पहा-

तर या आमदारांनी बीड जिल्ह्याची अब्रू वेशीवर टांगली असुन, जिल्हा बदनाम होण्यापासून वाचवा. अस देखील त्यांनी यावेळी म्हटलंय. दरम्यान जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थावरून मुंडे भगिनी आणि भाऊ धनंजय मुंडे यांच्यात चांगलाचं राजकारण तापले आहे. त्याचबरोबर भाजप आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षांमध्ये देखील पत्रकबाजी वॉर सुरू आहेत. त्यात आता शिवसेनेने उडी घेतल्याने, बीडचं राजकारण चांगलंच तापलल्याचं दिसून येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पीक नुकसान पाहणी

रशियाचा युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीवर हल्ला; 400 कोटी रुपयांचं नुकसान

Maharashtra Fort : घनदाट जंगलात ३२०० फूट उंचीवर वसलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला, ट्रेकिंगसाठी नक्की जा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार! सरकारचं मोठं आश्वासन; भविष्यातील पाणी, चारा...;

Housing Society : फ्लॅटधारकांसाठी मोठी बातमी! आता ३ वर्षांत पुनर्विकास पूर्ण करावाच लागणार; नवीन नियम लागू

SCROLL FOR NEXT