ajit pawar Saam TV
मुंबई/पुणे

Ajit Pawar: कोरोना वाढत असताना बेडच्या उपलब्धेवर अजित पवार म्हणाले...

राज्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये स्थानिक स्थिती पाहून पक्षाच्या चिन्हावरती ही निवडणूक लढविण्यात आली.

मंगेश कचरे

बारामती: कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असली तरी राज्यात बेडची उपलब्धता आहे. कोरोना झाला तरी लगेचच ऑक्सिजनची गरज भासत नाही ही वस्तुस्थिती आहे. रुग्ण देखील घरच्या घरीच काळजी व उपचार घेताना दिसत आहेत असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले आहे. महावितरण बाबतीत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार म्हणून यातून मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करू सध्या ग्रामीण भागात महावितरणकडून शेतकऱ्यांची वीज खंडित करण्याचे काम सुरू आहे या प्रश्नावर पवार म्हणाले की, ऊर्जामंत्री यांनी शेतकऱ्यांची पिके निघेपर्यंत वसुलीची कारवाई थांबवली होती.

शेतकऱ्यांच्या वीज बिलाचे थकीत असलेल्या बिलाचे व्याज व दंड व्याज माफ केले, असून शेतकऱ्यांनी पैसे भरले पाहिजेत त्यांना हप्ते पाडून देण्यात आले असून रब्बीचे पिके गेल्याशिवाय किंवा ही पिके हातात आल्याशिवाय पैसे भरता येणार नाहीत, ही वस्तुस्थिती असून जर तरीही काही अडचणीत येत असल्यास आघाडी सरकार म्हणून आम्ही मार्ग काढायला काढण्याचा प्रयत्न करू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

रोहित पवार यांच्या कष्टाला फळ

राज्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये स्थानिक स्थिती पाहून पक्षाच्या चिन्हावरती ही निवडणूक लढविण्यात आली. सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांचे कौतुक करत या निवडून आलेल्या उमेदवारांना महाविकास आघाडी सरकार मदत करेल. जो तो पक्ष आपल्या आपल्या पक्षवाढीसाठी प्रयत्न करत असतो. मागील काळात आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडीत असतानाही आम्ही एकत्र लढायचो. तर काही ठिकाणी स्थानिक व भौगोलिक स्थिती पाहून म्हणजेच कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर आदी भागात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशा देखील निवडणुका लढल्या जायच्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही महाविकास आघाडीतील या तिन्ही पक्षांनी या कोरोनाच्या काळात एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला व जिल्हास्तरीय स्तरावर या निवडणुका घेण्यात आल्या.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पुन्हा सुरू होणार का? महत्त्वाची अपडेट आली समोर

IPL Winner Prize Money 2026: IPLच्या विजेत्या संघावर होणार पैशांचा पाऊस; रनर-अपला किती मिळेल पैसा?

Naga Chaitanya: नागा चैतन्यने समंथाचं करियर खराब केलं; अभिनेत्यावर गंभीर आरोप, प्रकरण थेट हायकोर्टात पोहोचलं

IT मॅनेजरचा जॉब सोडला अन् महिला झाली रिक्षाचालक, महिन्याची कमाई किती?

Thyroid Care Diet : थायरॉईड कायम राहिल कंट्रोलमध्ये, औषधांसोबतच रोज खा 'हे' सुपरफूड

SCROLL FOR NEXT