पुण्यात भात शेतीची भव्य सुंदर रांगोळी (पहा व्हिडिओ) सागर आव्हाड
मुंबई/पुणे

पुण्यात भात शेतीची भव्य सुंदर रांगोळी (पहा व्हिडिओ)

यावर्षी प्रथमच पेरणीतून आणि लावणीतून अशी दोन वेगवेगळी चित्रे सादर झाली आहेत.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे - शेतात Farm वेगवेगळी रंगीत पाने असलेल्या भातरोपांची हाताने लावणी करून प्रचंड मोठी चित्रे निर्माण करण्याची अवघड कला जपानी शेतकऱ्यांनी गेली २८ वर्षे जोपासली आहे. ही कला ५ वर्षांपूर्वी सिंहगड पायथ्याच्या शेतात भारतात सर्वप्रथम विकसित केली. भात शेतीतले परंपरागत हस्तकौशल्य सध्याच्या यांत्रिकीकरणाच्या युगात जोपासणे हा या चित्रांचा उद्देश आहे. सह्याद्रीतले दुर्मिळ वन्य प्राणी पक्षी मी या कलेतून सादर केले आहेत.यावर्षी प्रथमच पेरणीतून आणि लावणीतून अशी दोन वेगवेगळी चित्रे सादर झाली आहेत.

जून महिन्यात दोन प्रकारच्या भाताचे बियाणे पेरून गव्याचे चित्र तयार केले होते. त्यानंतर ही दोन प्रकारची भातरोपे दोन महिने वाढल्यानंतर ऑगस्ट महिन्यात ती रोपे चिखलात लावणी करून 'जेरडन्स लीफबर्ड' या दुर्मिळ पक्ष्याचे चित्र केले आहे. हा पक्षी सह्याद्रीच्या सदाहरित जंगलात दिसतो. हिरव्या रंगामुळे तो शोधणे अवघड असते. आवाजावरूनच तो शोधावा लागतो.गेल्या वर्षी लहरी पावसामुळे भातरांगोळी करता आली नव्हती. या वर्षी मात्र एकाच हंगामात दोन चित्रे हा प्रयोग यशस्वी झाला.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शासकीय वसतीगृहातील 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा; जेवणानंतर होऊ लागला उलट्या आणि जुलाबचा त्रास

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये शासकीय वस्तीगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा

जयंत पाटलांना मोठा धक्का; निकटवर्तीयाचं नगराध्यक्षपद रद्द, काय आहे कारण?

Sunday Horoscope : महत्त्वाची कामे पूर्ण करा! 5 राशींच्या व्यक्तींचे नशीब पालटणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

SCROLL FOR NEXT