Viral Video : डोंबिवलीत भर रस्त्यात एकाला दांडक्याने जबर मारहाण, घटना CCTV मध्ये कैद! प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

Viral Video : डोंबिवलीत भर रस्त्यात एकाला दांडक्याने जबर मारहाण, घटना CCTV मध्ये कैद!

डोंबिवली पश्चिमेत राहणारे काशीनाथ भोईर (वय 42) यांना तीन अज्ञात व्यक्तींनी पहारा ठेवून लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली :  डोंबिवली पश्चिमेत राहणारे काशीनाथ भोईर (वय 42) यांना तीन अज्ञात व्यक्तींनी पहारा ठेवून लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनीही त्वरित तपास चालू केला आहे. 

डोंबिवली पश्चिमेत राहणारे काशीनाथ भोईर  हे सोमवारी रात्री तुळशी हाईट्स सोसायटीची वार्षिक सभा आटोपून निघाले होते. गोपीनाथ चौक येथून जात असताना श्रेयस हाईट्स या बिल्डिंग जवळ त्यांची दुचाकी आली असता तीन अज्ञात व्यक्तींनी पहारा ठेवून लाकडी दांडक्याने हल्ला केला. यात भोईर हे गंभीर झाले आहेत. त्यांच्या डोक्याला आणि पाठीला जबर मार लागला आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनीही त्वरित तपास चालू केला आहे.

मात्र, भर रस्त्यात भोईर यांना जबर मारहाण झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार काशीनाथ भोईर हे राजकारणात सक्रिय असतात. एका माजी नगरसेवकासाठी काम करतात. त्याचा राग ठेवून आणि निवडणूकीपूर्वी दहशत माजवण्यासाठी मारहाण केली आहे का? सवाल उपस्थित होत आहे. की दुसरे कोणते  कारण आहे हे आरोपी पकडल्यानंतरच समजेल.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

Anil Deshmukh : मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

Night Routine: रात्री झोपण्याआधी फक्त या २ गोष्टी करा, सकाळी प्रसन्न वाटेल

Maharashtra News Live Updates: आमदार राम सातपुते यांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

SCROLL FOR NEXT