घरासह महागड्या कारमध्येही गावठी दारुचा बेकायदा साठा  सागर आव्हाड
मुंबई/पुणे

घरासह महागड्या कारमध्येही गावठी दारुचा बेकायदा साठा

महिलेसह दोघांना अटक, राज्य उत्पादन शुल्क विभागाची बावधन बुद्रुकमध्ये कारवाई

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : घराबरोबरच महागड्या Expensive कारमध्ये गावठी दारुचा alcohol बेकायदेशीरपणे साठा करणाऱ्या एका महिलेसह दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने State Excise Department अटक Arrested केली आहे. गावठी दारुचे ६० प्लॅस्टिक कॅन असा एकूण अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने court आरोपीस ६ ऑगस्टपर्यंत पोलिस Police कोठडी सुनावण्यात आली आहे.

बावधन बुद्रुक Bavadhan Budruk ​याठिकाणी गुरूवारी ही कारवाई करण्यात आली आहे. विवेक मुकुटसिंग रजपूत (वय- ४१) रा. बावधन बुद्रुक, बिंदीया अनिल राजपुत (वय- ४६) रा. बावधन बुद्रुक असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींचे नाव आहे. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस. जे. डेरे यांनी फिर्याद दिली आहे. बावधन बुद्रुक गावाच्या हद्दीमध्ये फ्लेम कॅम्पस रस्त्यावर शेजारील एका बंगल्यात गावठी दारुचा बेकायदेशीरपणे साठा केला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार, पथकाने गुरूवारी बावधन बुद्रुक मधील क्षत्रीयनगर येथील त्रिशा बंगल्यामध्ये छापा मारण्यात आला.

त्यावेळेस बंगल्यामध्ये ३५ लिटरचे ३० कॅन, तर बंगल्याच्या आवारातमध्ये पार्कींग केलेल्या सॅंट्रो कारमध्ये (एमएच- १४, X ७४४४) प्लॅस्टिकचे १० कॅन असा असा १ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. दरम्यान, बावधन बुद्रुक येथील भुंडे वस्ती परिसरामधील बिंदीया राजपुत हिच्या घरावर देखील पथकाने छापा मारण्यात आला होता. घरामधून १५ कॅन आणि अल्टो कारमधून (एमएच- १२ LJ १२७९) ५ कॅन असा १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसनं विदर्भात भाकरी फिरवली! नव्या नेत्याकडे सोपवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर ६ दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

मुंबईमधील हायप्रोफाईल भागातील इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची पळापळ

माशांच्या वासाचं कारण देत कोळी महिलांना BEST बसमध्ये प्रवेश नाकारला; मुंबईतील संतापजनक प्रकार

भीमाशंकरच्या जंगलात 32 हजार झाडांची कत्तल; टोरंट पॉवरसाठी 600 एकरवरील झाडांवर कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT