Baramati News Saam Tv
मुंबई/पुणे

गावगुंडांच्या हैदोसानं डॉक्टर होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं; बारामतीच्या 'त्या' तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

Baramati News : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील अंकिता कडाळे या तरुणीने गावगुडांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. तिला शिकून डॉक्टर व्हायचे होते. पण गावगुंडामुळे तिचे आणि तिच्या कुटुंबियांचे हे स्वप्न अपूर्णच राहिले आहे.

Yash Shirke

पुण्याच्या बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द गावातील अंकिता कडाळे ही इयत्ता दहावीत शिकत होती. परवा (१३ मे) दहावी बोर्डाचा निकाल लागला. अंकिता तिच्या शाळेत पहिली आली. मिळवलेल्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी अंकिता या जगात नाहीये. गावगुंडांच्या जाचाला कंटाळून अंकिताने गळफास लावून आत्महत्या केली होती.

गरीब कुटुंबात जन्मलेल्या अंकिताला शिकून डॉक्टर व्हायचे होते. यासाठी ती मेहनत घेत होती. अभ्यास पूर्ण करुन तिने दहावीची परीक्षा दिली. याच दरम्यान गावातील काहीजण अंकिताला त्रास देत होते. 'माझ्याशी बोलली नाहीस, तर तुला आणि तुझ्या घरच्यांना खल्लास करुन टाकू' अशा धमक्या तिला मिळत होत्या. गावगुंड सतत पाठलाग करुन अंकिताला त्रास देत होते.

गावातील चार गुंड शस्त्र दाखवून अंकिताच्या मनात दहशत निर्माण करत असत. सतत होणारा पाठलाग आणि दमदाटीला कंटाळून अंकिताने एप्रिल २०२५ मध्ये राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. काल दहावीचा निकाल जाहीर झाला, गावच्या शाळेत अंकिता पहिली आल्याचा निकाल समोर आला. निकाल पाहून अंकिताच्या आईने हंबरडा फोडला. तिच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. निकाल लागल्यावर अंकिता नसल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गरीब घरातल्या अंकिताचे डॉक्टर होण्याचे स्वप्न गावगुंडांमुळे अपूर्णच राहिले आहे. तिला त्रास देणाऱ्या चार आरोपींपैकी फक्त एका आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. उरलेल्या तिघांवर कधी कारवाई होणार, त्यांना कधी अटक होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी हीच अंकितासाठी श्रद्धांजली ठरेल असे तिच्या पालकांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air fare Hike: युद्धाचा फटका विमान प्रवासाला, तिकीटाच्या दरात मोठी वाढ; किती खर्च करावा लागणार?

कोरोना लसीमुळे साईड इफेक्ट्स झाला? सरकारला द्यावा लागणार मोबदला; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Maharashtra Live News Update : कोल्हापूरमध्ये कमर्शियल गॅस पुरवठा तात्पुरता बंद

New Rule : कार, दुचाकी ट्रान्सफरसाठी आता NOC ची गरज नाही, सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय, वाचा

Trending Blouse Designs: ब्लाऊजच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स, कोणत्याही साडीत उठून दिसेल मागचा गळा

SCROLL FOR NEXT