Accident News  Saam Tv
मुंबई/पुणे

Accident News : सहलीहून परतणाऱ्या विद्यार्थिनींच्या बसचा अपघात; 24 मुली जखमी

या अपघातात 24 मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत.

मंगेश कचरे

Baramati Accident News : बारामतीमधून मोठी बातमी समोर येत आहे. सहलीहून परतणाऱ्या विद्यार्थिनींच्या बसचा अपघात झाला आहे. या अपघातात 24 मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत. इचकरंजी येथील एका क्लासकडून 8 ते 10च्या मुलींसाठी सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

चालकाचे गाडीवरील नियत्रन सुटल्याने अपघात झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या अपघातामध्ये तीन मुली गंभीर जखमी झाल्या असून, 24 मुलींना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्व जखमींवर बारामतीतील महिला रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सहल औरंगाबाद आणि शिर्डीला गेली होती. मात्र शिर्डी येथून परत इचलकरंजीकडे येत असताना पाहुणेवाडी गावात या बसचा अपघात झाला. या अपघातामध्ये तीन मुली गंभीर जखमी झाल्या असून, 24 मुलींना किरकोळ दुखापत झाली आहे.

या बसमध्ये एकूण 48 मुली व 5 शिक्षक प्रवास करत होते. या अपघाताचं नेमकं कारण काय हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असावा असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT