लैंगिक समस्येने त्रस्त झालेल्या पतीने मित्रांना बायकोवर करायला लावला बलात्कार Saam Tv
मुंबई/पुणे

लैंगिक समस्येने त्रस्त झालेल्या पतीने मित्रांना बायकोवर करायला लावला बलात्कार

पतीला लैंगिक समस्या असल्याने मित्रांना पत्नीशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याप्रकरणी बारामती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

मंगेश कचरे, साम टीव्ही, जुजेरी

पुणे : पतीला लैंगिक समस्या असल्याने मित्रांना पत्नीशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याप्रकरणी बारामती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती (Baramati) तालुक्यातील तालुक्यातील एका गावात ही विकृत घटना घडली आहे. पत्नीने पती आणि त्याच्या मित्रा (Friend) विरोधात बारामती शहर स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील ३ वर्षांपासून आरोपी पती वेगवेगळ्या मित्रांकडून आपल्या पत्नीवर बलात्कार (abuse) करायला लावत होता. आरोपी पतीच्या सततच्या या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने अखेर बारामती शहर पोलीस (Police) ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी पतीसह ५ जणांना ताब्यात (5 arrested) घेतले आहे. आणखी काही आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

हे देखील पहा-

बारामती जवळील एका गावातील रहिवासी असणाऱ्या तरुणाचे २०१६ साली एका तरुणीशी लग्न झाले होते. पण लग्नानंतर काही दिवसांतच दोघांमध्ये लैंगिक समस्या निर्माण झाले होते. पती समलैंगिक असल्याने तो आपल्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवू शकत नव्हता. सुरुवातीचे काही दिवस पत्नीने याकडे दुर्लक्ष केले होते. पण कालांतराने त्यांच्यातील लैंगिक समस्या वाढतच गेली. यातून आरोपी पतीने एकेदिवशी आपल्या पत्नीच्या वॉट्सअॅप (WhatsApp) क्रमांकावरून आपल्या मित्रांना मेसेज केला आणि त्यांना भेटायला घरी बोलावले.

मित्र घरी आल्यानंतर विकृत पतीने मित्राला पत्नीवर बलात्कार करण्यास सांगितले. मित्र पत्नीवर बलात्कार करत असताना, मानसिकदृष्या विकृत पती खूश होतं होता. २०१७ ते २०२१ दरम्यान विकृत पतीने अशाच प्रकारे आपल्या वेगवेगळ्या मित्रांकडून पत्नीवर बलात्कार करायला लावत असत. पत्नीसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याकरिता पती रोज एका वेगळ्या मित्राला आमंत्रित करत असायचा.

पत्नीने या प्रकाराला विरोध केल्यामुळे, दोघांमध्ये वाद देखील होत असायचा. सहा महिने दोघांत वाद झाल्यानंतर नवऱ्याने माफी मागितली. पण परत नवऱ्याने तोच प्रकार सुरू ठेवला. पतीच्या या विकृत कृत्याला संतापलेल्या पत्नीने अखेर माहेरी जाऊन संबंधित प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला आहे. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात जाऊन पीडितेवर ७ ते ८ जणांनी बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत पतीसह ५ जणांना अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फुले दिले की फुलेच मिळतात, कुणी टीका केली, तरी शांत राहायचं; जॅकी श्रॉफ असे का म्हणाले?

कोकणातून तटकरेंच्या मुलाची बिनविरोध निवड; महायुतीत खदखद, शिंदेसेनेची फरफट

इंडिया आघाडीला मोठा धक्का; ३० खासदार असलेल्या पक्षाने फिरवली महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

SCROLL FOR NEXT