समीर वानखेडे विकास काटे
मुंबई/पुणे

'सदैव तुमच्या सोबत..' समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ ठाण्यात लागले फलक

समीर वानखेडेंचे विरोधक आणि समर्थक असे दोन गट तयार झाले आहेत.

विकास काटे, साम टीव्ही, ठाणे

ठाणे : मुंबई ड्रग्ज आणि आर्यन खान (Aryan Khan) अटक प्रकरणा मध्ये जास्त चर्चेत आलेले एनसीबीचे NCB मुंबई विभागीय अधिकारी समीर वानखेडेंवरती (Sameer Wankhede) महाविकास आघाडी सरकार मधील अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक Navab Malik यांच्या कडून अनेक आरोप करण्यात येत आहेत तसेच मलिकांनी याआधी देखील वानखेडेंना तुरुंगात डांबणार, त्यांची नोकरी घालवणार अशा धमक्या देखील दिल्या होत्या.

हे देखील पहा -

दरम्यान मलिकांनी आता वानखेडेंसह त्यांच्या सर्व कुटुंबावरतीच अनेक आक्षेप घेतले आहेत त्यांच्या कुटुंबाबत अनेक नवनवीन खुलासे ते करत आहेत. अशातच किरण गोसावीचा Kiran gosavi बॉडीगार्ड असणाऱ्या प्रभाकर साईलने Prabhakar Sail ड्रग्ज पार्टी प्रकरणात वानखेडेंना 8 कोटी रुपये मिळणार होते असा आरोप केल्याने वानखेडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच त्यांची चोकशी करा अशी देखील मागणी होत आहे.

मात्र अशा परिस्थितीत समीर वानखेडेंचे विरोधक आणि समर्थक असे दोन गट तयार झाले आहेत अशातच आता वानखेडे याच्या एका समर्थकाने ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटल (Civil Hospital) समोर वानखेडेंना समर्थन देण्यासाठी एक फलक लावण्यात आला आहे. त्याच्या वरती 'सदैव तुमच्या सोबत' असे मजकूर असणारे फलक लावण्यात आले आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अतिवृष्टीने पूल वाहून गेला; एसटी बंद, विद्यार्थ्यांची दररोज ५ ते १० किमी पायपीट

शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यावर फिरतात; अमित शहा यांच्या भेटीवर संजय राऊतांचा हल्लाबोल

Maharashtra Politics मोठी बातमी! शरद पवार NDA सोबत? शिंदेसेनेचं वजन कमी होणार?

Aamir Khan: 'गौरी हिंदू नाही..., माझ्या कोणत्याही पत्नीने धर्मांतर केलं नाही', 'लव्ह जिहाद'च्या आरोपांवर आमिर खानचं स्पष्टीकरण

Weight loss plan: 1 महिन्यात कमी करा 5 ते 7 किलो वजन कमी; तज्ज्ञांनी सांगितला सोपा डाएट आणि फिटनेस प्लॅन

SCROLL FOR NEXT