Mumbai Fire News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Fire News: मुंबईत अग्नितांडव! वांद्र्यात झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल

Mumbai News Today: मुंबईतील वांद्रे येथील झोपडपट्ट्यांना आग लागल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

सचिन गाड

Mumbai Fire News: मुंबईतील वांद्रे येथील झोपडपट्ट्यांना आग लागल्याची घटना घडली आहे. वांद्रे येथील सात ते आठ झोपडपट्ट्यांना आग लागल्याची घटना पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे . या आगीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आग लागल्याच्या घटनेनंतर ९ फायर इंजिन आणि ६ पाण्याचे टँकर घटनास्थळी पोहोचले आहेत. अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे येथील नर्गिस दत्त रोड जवळील झोपडपट्टीला आग लागल्याची घटना घडली आहे. बुधवारी पहाटे सकाळी ४:३० च्या सुमारास लागली आग लागली आहे. वांद्रे येथील नर्गिस दत्त रोड जवळील सात ते आठ झोपड्यांना आग लागली आहे.

झोपडपट्टीमधील घरांना आग लागल्याची वृत्त कळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक विभागाचे ९ फायर इंजिन आणि ६ पाण्याचे टँकर घटनास्थळी पोहोचले आहेत. सध्या अग्निशामक दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. या आगीत अद्याप कोणीही जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. पहाटेच्या सुमारास घरांना आग लागल्याने वस्तीतील लोकांमध्ये एकच खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ, पुढील काही दिवसांत महायुती फुटणार?, कुठे पडली ठिणगी?

शेवटच्या एका तासात खेळ खल्लास! शेअर बाजारात फुटला आपटीबॉम्ब, गुंतवणूकदारांच्या गटांगळ्या, 700,000 कोटींचा चुराडा

Shikhar Dhawan: हार्दिक पंड्यानंतर आणखी एका क्रिकेटरचा गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक फोटो व्हायरल; लवकरच दुसरं लग्न करणार

Maharashtra Live News Update: चाळीसगाव शहरात वादानंतर एपीआय भरत चौधरी यांची बदली

Satara Tourism : बोटीतून पाहा सह्याद्रीचे सुंदर नजारे, साताऱ्यात आहे 'हे' खास लोकेशन

SCROLL FOR NEXT