bandatatya karadkar saam tv
मुंबई/पुणे

गांधीजींचा अंहिंसावाद अन् हिंदूत्व पक्षपाती; बंडातात्यांचं पुन्हा वादग्रस्त विधान

1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळाले ते अंहिसेच्या मार्गाने मिळालं नाही तर 1942 क्रांतीकारक चळवळ उभी राहिली त्या चळवळीचा बोध इंग्रजांनी घेतला.

गोपाल मोटघरे

पुणे: नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असणाऱ्या बंडातात्या कराडकरांनी आज महात्मा गांधीच्या अंहिसावादी विचारांना लक्ष केलं आहे. महात्मा गांधीजींचा अंहिंसावाद आणि महात्मा गांधीजींचं हिंदूत्व हे दोन्ही पक्षपाती असल्याचे वादग्रस्त विधान आज जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी हुतात्मा राजगुरुंच्या स्मुर्तीस्थळावर प्रवचन रुपी सेवा देताना केलं आहे. यावेळी बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्ती संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळाले ते अंहिसेच्या मार्गाने मिळालं नाही तर 1942 क्रांतीकारक चळवळ उभी राहिली त्या चळवळीचा बोध इंग्रजांनी घेतला. कुठतरी सांगितले जाते कि देशाच्या स्वातंत्र्यासाठी साबरमती के संत तुन्हे कर दिया कमाला मिली हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल...असं म्हणणं म्हणजे झाशीच्या राणीसह 350 क्रांतीकारकांचा अपमान असल्याचे कराडकरांनी म्हटलं आहे.

क्रांतीकारक भगतसिंगाच्या मनात महात्मा गाधींची छाप होती. मात्र महात्मा गांधीजीचा अंहिसावाद भगतसिंगाच्या मनात ठसावला होता. आपल्या देशाला स्वातंत्र अंहिसक मार्गाने मिळवायचे हा भगतसिंगाच्या भ्रमाचा भोपळा तीन वर्षातच फुटला. जालियनवाला बाग हत्याकांडाला गाधींनी समर्थन द्यायला नकार दिल्यानंतर त्यांनंतर भगतसिंग आणि गांधीजी यांच्यात नाराजी उभी राहिली.

महात्मा गांधीजींना म्हता-याची उपमा देत त्यांच्या मार्गाने जाण्याचे कारण नाही त्यानंतर भगतसिंग क्रांतीकारक बनले. या दरम्यान लोकमान्य टिळकांची आठवण करुन देत *या म्हता-याच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवायचा विचार केला तर 1 हजार वर्ष लागतील असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. बंडातात्या कराडकरांनी हुतात्मा राजगुरुंच्या जन्मभुमीतून महात्मा गांधीच्या विचारांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटणार हे मात्र नक्की.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT