Balasaheb Thorat and ashok chavan  saam t
मुंबई/पुणे

Balasaheb thorat news | अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार का ? बाळासाहेब थोरात स्पष्टच बोलले

काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी अशोक चव्हण-देवेंद्र फडणवीस भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

Balasaheb Thorat News : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोन्ही दिग्गज नेत्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचा एक मोठा गट भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर आता काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिंदे सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार हा ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. या मंत्रीमंडळात काँग्रेसच्या दोन माजी मंत्र्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असण्याचीही शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चेवरून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केले आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले, 'काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माझे सहकारी अशोक चव्हाण यांच्या संदर्भात माध्यमांमध्ये येत असलेले वृत्त असत्य, खोडसाळपणाचे व लोकांची दिशाभूल करणार आहे. अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्येच आहेत. ते आमचे जेष्ठ नेते आहेत. आम्ही एकत्र काम करतो आहोत. अशोक चव्हाण हे भारत जोडो यात्रेच्या नियोजनातही सक्रिय आहे'

'अशोक चव्हाण हे गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मित्राच्या घरी गेले. तेथे राजकीय नेत्याची भेट झाली. मात्र, त्या भेटीचा असा अर्थ लावणे योग्य नाही. आम्ही एकत्र मिळून महाराष्ट्रात कॉंग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत. माध्यमांनी अशोक चव्हाण यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याच्या संदर्भाने जबाबदारीने वृत्तांकन करणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत अशोक चव्हाण आणि काँग्रेसच्या संदर्भाने चुकीच्या बातम्या देऊन जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात आहे. माध्यमांना विनंती आहे त्यांनी हे थांबवावे', असेही थोरात म्हणाले'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

Crime: मेहुण्याच्या प्रेमात झाली वेडी, जगात येण्यापूर्वीच बाळाला संपवलं अन् कचऱ्यात फेकलं

Marathi Vijay Melava: ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी वरळी डोमबाहेर मराठी जनसागर|VIDEO

SCROLL FOR NEXT