balasaheb thackeray and eknath shinde Saam Tv
मुंबई/पुणे

'पैसा येतो, पैसा जातो, पुन्हा येतो...'; शिंदेंच्या बंडखोरीनंतर बाळासाहेबांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

राजकीय घडामोडीनंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि काही शिवसेना आमदारांच्या बंडाळीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्व आणि मुख्यमंत्रीपदाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेशी फेसबुक लाईव्ह साधत बंडखोर आमदारांपैकी कोणी समोर येऊन राजीनामा देण्यास सांगितलं तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईल, असं आवाहन बंडखोर आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. मात्र, राजीनामा देण्याआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शासकीय वर्षा निवासस्थान सोडलं आहे. त्यामुळे शिवसैनिकांना गहिवरून आलं आहे. याचदरम्यान या सर्व राजकीय घडामोडीनंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Eknath Shinde Latest News In Marathi )

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकीय वर्षा बंगला राजीनामा देण्याआधीच सोडला आहे. उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडताच शेकडो शिवसैनिक जमा झाले आहे. अनेक शिवसैनिक आणि महिला शिवसैनिकांनाही गहिवरून आलं आहे. तर एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

याचदरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 'पैसा येतो, पैसा जातो, पुन्हा येतो... पण एकदा का नाव गेलं तर पुन्हा येत नाही... ते येऊ शकत नाही, काळ्या बाजारात सुद्धा मिळायचं नाही', अशा आशयाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

...तर मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे : उद्धव ठाकरे

शिवसेनेचे (Shivsena) ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३३ शिवसेना आमदार गुवाहटीमध्ये गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेत खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुकवरुन संवाद साधला. 'बंड केलेल्या आमदारांनी मला समोर येऊन सांगा, मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, 'हिंदुत्व सोडल्याची चर्चा सुरू आहेत, अस मी काय केले आहे की मी हिंदुत्वापासून बाजूला गेलो आहे. गेल्या अडीच वर्षापासून मुख्यमंत्री पदावर आहे. आता माझ्यासोबत मंत्रिमंडळात आहेत ते बाळासाहेब यांच्यासोबत असणारेच शिवसैनिक आहेत. मला कशाचाही अनुभव नसताना जबाबदारी जिद्दीने पार पाडली'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत येणारच, १२ सप्टेंबरला निर्णय होणार- मनोज जरांगे

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

Pune News: दहीहंडीत अश्लील नृत्य, पुण्यात डान्सर निशा मुंबईकर अन् शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

SCROLL FOR NEXT