Badlapur News Saam Tv
मुंबई/पुणे

Badlapur News: बदलापूरकरांसाठी गुड न्यूज; थेट पनवेल अन् जेएनपीटी कनेक्टिव्हीटी मिळणार

बदलापूरच्या बेंडशीळ गावाजवळ साडेचार किमीचा बोगदा

अजय दुधाणे

Badlapur News: बडोदा जेएनपीटी महामार्गाचं काम सध्या महाराष्ट्रात प्रगतीपथावर आहे. हा महामार्ग अंबरनाथ तालुक्यातल्या बदलापूरमधून जात असून त्यामुळं भविष्यात बदलापूरला थेट पनवेल आणि जेएनपीटी कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. सोबतच बदलापूरजवळ लॉजिस्टिक हब उभारणीला या महामार्गामुळे चालना मिळणार असून पर्यायानं उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधीही येणार आहेत. त्यामुळं या महामार्गासोबतच 'समृद्धी'ची दार सुद्धा उघडली जाणार आहेत. (Latest Marathi News)

बडोदा ते जेएनपीटी महामार्गाचं काम सध्या महाराष्ट्रात जोरात सुरू आहे. महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यातील तलासरी ते रायगड जिल्ह्यात पनवेल (Panvel) तालुक्यातील करंजाडे गावापर्यंत हा महामार्ग असेल. महाराष्ट्रात (Maharashtra) १८९ किमी लांब आणि १२० मीटर रूंद असा हा आठ पदरी महामार्ग असेल. हा रस्ता अंबरनाथ तालुक्यात बदलापूर (Badlapur) शहराजवळून जात असून त्यामुळं बदलापूर शहराला भविष्यात बडोदा आणि जेएनपीटीची थेट कनेक्टिव्हीटी मिळणार आहे.

बदलापूरच्या बेंडशीळ गावाजवळ सध्या या रस्त्याचं काम जोरात सुरू आहे. सोबतच बदलापूरहून पनवेल तालुक्यात जाण्यासाठी डोंगरातून बोगदा खोदण्याचं काम बेंडशीळ गावाजवळ सुरू करण्यात आलंय. तब्बल साडेचार किमी लांबीचा हा बोगदा पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यानुसार जानेवारी २०२५ पर्यंत बोगद्याचं काम पूर्ण होईल, तर जून २०२५ पर्यंत या संपूर्ण रस्त्याचं काम पूर्ण होऊन रास्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. (Maharashtra News)

या महामार्गावर जाण्यासाठी कल्याण तालुक्यातील रायते आणि बदलापूरच्या दहिवली गावातून इंटरचेंज असणार आहे. सोबतच मुंबई-अहमदाबाद महामार्ग आणि मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गही या महामार्गाला जोडलेले असणार आहेत. त्यामुळं अंबरनाथ तालुक्यातील प्रवाशांना नवी मुंबई, पालघर, गुजरात, नाशिक, नागपूर या सर्व ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगवान आठ पदरी महामार्ग उपलब्ध होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samruddhi Highway Accident : समृध्दीवर भयंकर अपघात, ८ जणांचा जागीच मृत्यू, ट्रकच्या धडकेत पिकअपचा चुराडा

Maharashtra Live News Update : पुणे शहरासह जिल्ह्याला आजही यलो अलर्ट

India Tourism : लाल दगड अन् संगमरवरी कला, 'हा' वास्तुकलेचा अद्भुत नजारा पाहून तुमचे डोळे दिपतील

Ladki Bahin Yojana: पात्र आहात, ईकेवायसीही केली, पण हप्ता बंद; ₹१५०० मिळवण्यासाठी लाडक्या बहि‍णींनी काय करायचं?

Kelyacha Sheera Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरच्या घरी बनवा मऊसूद आणि चविष्ट केळ्याचा शिरा

SCROLL FOR NEXT