VIDEO : बदलापूर प्रकरणातील आरोपी Akshay Shinde याच घर संतप्त गावकऱ्यांनी तोडलं; पाहा व्हिडीओ.. SAAM TV
मुंबई/पुणे

Badlapur Crime : बदलापूर प्रकरणातील नराधम अक्षय शिंदेनं ३ वेळा थाटलाय संसार, पण एकही नांदली नाही!

Who is Akshay Shinde : २४ वर्षीय अक्षय शिंदे याचं शाळेतच कूकर्म केलं, त्यामुळे राज्य हादरलेय. त्याला आज कोर्टात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

अजय दुधाणे, साम प्रतिनिधी

Badlapur Crime News : बदलापूर शाळेत दोन चिमुकल्यांच्या अब्रूशी खेळ करणाऱ्या अक्षय शिंदेंबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अक्षय शिंदे याची आतापर्यंत तीन लग्न झाली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, अक्षय शिंदे याला तिन्ही बायका सोडून गेल्या आहेत. २४ वर्षीय अक्षय शिंदे याचं शाळेतच कूकर्म केलं, त्यामुळे राज्य हादरलेय. त्याला आज कोर्टात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बदलापूर पूर्वेतील खरवई गावात राहणाऱ्या अक्षय शिंदेचे वय केवळ 24 वर्षे असले तरी त्याचे आधीच तीन वेळा लग्न झाले होते, मात्र तिन्ही पत्नी त्याला सोडून गेल्या आहेत. अक्षयचे शिक्षण दहावीपर्यंतच झाले असून तो बदलापूरमधील एका शाळेत शिपाई म्हणून काम करत आहे. या आधी तो एका इमारतीत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होता. त्यानंतर एका कंत्राटाद्वारे त्याला आदर्श शाळेत शिपाई म्हणून नोकरी मिळाली.

अक्षय शिंदेच्या घरावर हल्ला, तोडफोड -

अक्षय कर्नाटकातील गुलबर्गा गावातील असून त्याचा जन्म बदलापूरमधील खरवई गावात झाला. तो खरवई गावातील एका चाळीत आपल्या आई-वडील, भाऊ आणि भावाच्या पत्नीसोबत राहत होता. मात्र गावकऱ्यांनी त्याच्या घरावर हल्ला करून तोडफोड केली आहे. अक्षयचे नातेवाईक देखील शेजारीच राहत होते, त्यांच्याही घराची तोडफोड गावकऱ्यांनी केली. या घटनेनंतर अक्षय आणि त्याचे कुटुंब खरवई गावातून गायब झाले आहे.

गावातील महिलांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, अक्षयचे तीन वेळा लग्न झाले होते, परंतु कोणतीही पत्नी सध्या त्याच्यासोबत राहत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

राज्यातील सर्व शाळांच्या परिसरात HFSS अन्नपदार्थांच्या विक्रीवर निर्बंध; अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT