Badlapur School Girl Incident:  Saamtv
मुंबई/पुणे

Badlapur School Case: संताप, उद्रेक, बदलापूरकर रस्त्यावर, भयंकर अत्याचाराची घटना नेमकी काय? आत्तापर्यंत काय काय घडलं? वाचा सविस्तर...

Badlapur School Girl Incident: बदलापूर पुर्व भागातील एका नामांकित शाळेमध्ये साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर बदलापूरमधील नागरिकांनी रस्त्यावर उतरुन बदलापूर बंदची हाक दिली आहे.

Gangappa Pujari

बदलापूर, ता. २० ऑगस्ट २०२४

बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर बदलापूरमधील नागरिकांनी रस्त्यावर उतरुन बदलापूर बंदची हाक दिली आहे. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरु केले असून पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली आहे. काय आहे हे अत्याचाराचे नेमके प्रकरण? आत्तापर्यंत काय काय कारवाई झाली? वाचा सविस्तर..

काय आहे घटना?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बदलापूर पुर्व भागातील एका नामांकित शाळेमध्ये साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात करण्यात आल्याची घटना घडली. या दोन्ही चिमुकल्या मुली लघुशंकेसाठी गेल्या असताना शाळेतील सफाई कर्मचाऱ्यानेच त्यांच्यावर अत्याचार केले. ही घटना १२ आणि १३ ऑगस्ट रोजी घडली होती. पीडित मुलगी शाळेत जायला तयार होत नसल्याने तिच्या आजोबांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता अत्याचार झाल्याचे समोर आले.

गुन्हा नोंद करण्यास टाळटाळ

आणखी एका मुलीसोबतही सारखाच प्रकार घडल्याची माहिती ही समोर आली. दोन्ही मुलींच्या कुटुंबीयांनी १६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली. मात्र रात्री एक वाजेपर्यंत त्यांचा एफआयआर नोंदवून घेण्यात आला नाही. गुन्हा दाखल होण्यासाठी तब्बल १२ तास ताटकळत ठेवण्यात आले. अखेर राजकीय हस्तक्षेपानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

आत्तापर्यंत काय काय कारवाई झाली?

दरम्यान, याप्रकरणी मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय शिंदे (वय, २४) असे या नराधम आरोपीचे नाव असून तो या शाळेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. त्याचबरोबर या प्रकरणात शाळेचे मुख्याध्यापिकेचे आणि मुलींची देखभाल करत आलेल्या दोन सेविकांचेही निलंबन केले आहे. तक्रार नोंदवण्यास विलंब केल्याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून शाळेलाही नोटीस पाठवण्यात आली आहे. यासाठी एक समितीही नेमण्यात आली आहे.

SIT स्थापन करण्याचे आदेश

पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : ठाण्यातील मतमोजणी केंद्राबाहेर कडेकोट बंदोबस्त

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT