arrest Saam Tv
मुंबई/पुणे

पत्नीच्या डोक्यात मारला हाताेडा; पतीस अटक

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली हाेती.

अजय दुधाणे

बदलापूर : मद्यधुंद पतीनं (husband) पत्नीच्या (wife) डोक्यात हातोड्याने प्रहार केल्याची घटना बदलापूरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली हाेती. दरम्यान याप्रकरणी बदलापूर (badalapur) पूर्व पोलिसांनी पतीला बेड्या (arrest) ठोकल्या आहेत. (badlapur news)

बदलापूरच्या खरवई परिसरातील काथोडवाडी झोपडपट्टीत गोरख भोईर (gorakh bhoir) हा पत्नी सवितासोबत वास्तव्याला आहे. शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास सविता घरी असताना गोरख भोईर हा मद्यधुंद अवस्थेत तिथं आला आणि तिच्याशी भांडू लागला.

याच वादात गोरख यानं हातोड्याने सविताच्या डोक्यात प्रहार केला. यामध्ये जखमी झालेल्या सविताला तातडीनं बदलापूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं तिच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आलं. या घटनेप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी गोरख याला अटक केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : हाय बीपीचा त्रास आहे? मग 'या' 7 पदार्थांपासून राहा दूर,ह्रदय राहील निरोगी

Tuesday Horoscope : आर्थिक लाभ होणार; ५ राशींच्या व्यक्तींना मिळणार नव्या संधी, वाचा आजचे राशीभविष्य

Blood Pressure : BP नियंत्रणात ठेवायचा आहे? मग पाणी पिण्याच्या या 7 गोष्टी अजिबात दुर्लक्षित करू नका

Mumbai AC Local Train: लोकलचं AC बंद, प्रवासी गुदमरले; आता लोकलच्या आतही मृत्यूची भीती?

Amir Khan Marriage: आमिर खान लव जिहादचा ब्रँड अम्बेसेडर; तिसऱ्या लग्नावरून वाद उफाळला

SCROLL FOR NEXT