Badlapur Police Station अजय दुधाणे
मुंबई/पुणे

Crime: ज्वेलर्सच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दागिने चोरी; घटना सीसीटीव्हीत कैद

बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनेची नोंद करण्यात आली असून ,पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.

अजय दुधाणे

बदलापूर - मध्ये ज्वेलर्सच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दुकानातील दागिने चोरून नेल्याची घटना रविवारी संध्याकाळी बदलापुरात घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. बदलापूर (Badlapur) पश्चिमेला रमेशवाडी परिसरात मिलन ज्वेलर्स (Jewellery) या दुकानात ही धक्कादायक घटना घडली आहे.

हे देखील पहा -

सखाराम चौधरी यांचं बदलापूर पश्चिमेला रमेशवाडी परिसरात मिलन ज्वेलर्स हे दुकान आहे. या दुकानात एक इसम आला आणि त्याने सोन्याच्या चैन आणि ब्रेसलेट दाखवण्यास सांगितले. त्यानुसार सखाराम चौधरी यांनी 83 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पाच चैन आणि दोन ब्रेसलेट काढून काउंटरवर ठेवले. त्यानंतर चोरट्याने सोन्याची अंगठी दाखवण्यास सांगितल्याने चौधरी हे अंगठी काढण्यासाठी पाठमोरे वळले असता चोरट्याने त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली आणि दागिने घेऊन पोबारा केला.

दुकानाबाहेर उभ्या असलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून हा चोरटा उल्हास नदीच्या दिशेनं पळून गेला. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चोरट्याने तब्बल साडे आठ तोळ्याचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनेची नोंद करण्यात आली असून ,पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Property Rights: नातवाला नाही मिळणार आजोबांची जमीन, हायकोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय

Maharashtra News Live Update: मुंबई-सावंतवाडी नव्या रेल्वेचे सावंतवाडीत जल्लोषात स्वागत

Hair Care: केसातील कोंडा आणि खाजेपासून मिळवा आराम; नारळाच्या तेलात मिसळा 'ही' एक गोष्ट

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

SCROLL FOR NEXT