Badlapur Crime News Saam Digital
मुंबई/पुणे

Badlapur Crime News : बदलापूर हादरलं! नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर अत्याचार

Badlapur Crime : बदलापूरमधील एका नामांकित शाळेत धक्कादाय घटना घडली आहे. साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे.

Sandeep Gawade

उरणमधील प्रेमप्रकरणातून तरुणीच्या खूनाची घटना ताजी असतानाच बदलापूरमधील एका नामांकित शाळेत धक्कादाय घटना घडली आहे. साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. बदलापुरातील ही सर्वात मोठी शाळा आहे.पीडित मुलगी शाळेत जायला तयार होत नव्हती. त्यावेळी तिच्या आजोबांनी तिची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय तपासणीत अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान या घटनेमुळे बदलापूर शहरात खळबळ माजली आहे.

पोलिसांच्या निष्काळजीपणाचा कळस म्हणजे सुरुवातीला मुलींच्या पालकांची तक्रार नोंद करून घेण्यात आली नव्हती. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. तब्बल १२ तासांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्या नराधमला अटक केली आहे, मात्र नाव जाहीर केलं नसल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी शंका उपस्थित केली आहे. तसंच शाळेवर येत्या मंगळवारी धडक मोर्चा काढण्याचा इशारा दिला असून सर्व पक्षांना या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरच्या पूर्वेला सर्वात मोठी आणि एक नामांकित शाळा आहे. या शाळेत शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या दोन मुली शाळेत लघुशंकेसाठी गेल्या होत्या. ही संधी साधून शाळेतीलच एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला. 12 आणि 13 ऑगस्ट रोजी सलग दोन दिवस अत्याचार करण्यात आले आहेत. असाच प्रकार दुसऱ्या मुलीसोबतही घडला आहे. या दोन्ही मुलींचे कुटुंबीय 16 ऑगस्ट रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेले होते. मात्र रात्री एक वाजेपर्यंत त्यांची तक्रार नोंद करून घेतलेली नव्हती.

पोलीस तक्रार नोंदवून घेण्यात टाळाटाळ करत असल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी यात हस्तक्षेप केला. थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क साधला त्यावेळी बदलापूर पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली आहे. त्यानंतर आरोपीला अटकही करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी त्याचं नाव जाहीर केलेलं नाही. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. या घटनेळे बदलापूर शहारात खळबळ माजली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

SCROLL FOR NEXT