Badalapur Case Accused Akshay Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Badlapur School Case : आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; आता पुढे काय?

Badalapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीची पोलिस कोठडी संपल्यामुळे आज त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते.

Priya More

बदलापूर दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाती आरोपी अक्षय शिंदेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीची पोलिस कोठडी संपल्यामुळे आज त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये केली. आरोपीची रवानगी तळोजा कारागृहामध्ये करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे पोलिस कोठडीमध्ये होता. अक्षय शिंदेची पोलिस कोठडी आज संपत असल्यामुळे त्याला आज कल्याण कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. कोर्टाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. विशेष महिला न्यायाधीश व्ही ए पत्राववळे यांच्या कोर्टासमोर सुनावणी झाली. कोर्टाने आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये केली.

अक्षय शिंदेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्या रवानगी तळोजा कारागृहामध्ये करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीनंतर वकील प्रियेश जाधव यांनी सांगितले की, 'शाळेच्या मुख्याध्यापिका संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी हे आरोपी पाहिजे आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोक्सोअंतर्गत कलम सहा आता लावण्यात आलेला आहे. या कलमांतर्गत २० वर्षे किंवा जन्मठेपेची शिक्षा आहे.

दरम्यान, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की, 'कुळगाव बदलापूरच्या घटनेसंदर्भात एक अहवाल आता प्राप्त झाला आहे.आता डिपार्टमेंटेची बैठक होईल आणि या अहवालावर आम्ही काय निर्णय घेऊ ते तुम्हाला सांगू. जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करु. पोलिसांना सर्व अहवाल सादर करू. हा जो अहवाल मला प्राप्त झाला आहे त्याचा आधार घेऊन पोलिस कोणाला सह आरोपी करायचं आहे ते पाहतील. याप्रकरणात कोणाला ही सोडणार नाही. बदलापूरचा उद्रेक कारवाई वेळेत न झाल्याने झाला.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अजुनही वाऱ्यावर; लोकल प्रवाशाकडे सापडला 35 सेमीचा चाकू

Maharashtra News Live Update: विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य; त्यांनी हिंसा केली नाही - राहुल गांधी

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

ट्रेडिशनल ते मॉडर्न, ठुशी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT