Badlapur : इमारतीच्या 11व्या मजल्यावरुन पडून मजूराचा मृत्यू अजय दुधाणे
मुंबई/पुणे

Badlapur : इमारतीच्या 11व्या मजल्यावरुन पडून मजूराचा मृत्यू

सिमेंटच्या गोण्या वाहून नेताना तोल गेल्याने घडली घटना

अजय दुधाणे

बदलापूर : इमारतीच्या 11 व्या मजल्यावरुन पडून मजूराचा मृत्यु झाल्याची घटना बदलापुर मध्ये घडली आहे. रामदास गौतम असे त्या मजुराच नाव असून, तो 22 वर्षाचा होता. आज दुपारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. बदलापूर कात्रप परिसरात थारवानी प्रीमियम सिटी या गृहसंकुलाच बांधकाम सुरू आहे .

हे देखील पहा-

या बांधकामावर हा मजूर काम करत होता. 11 व्या मजल्यावर सिमेंटच्या गोण्या घेऊन जात असताना त्याचा तोल जाऊन तो लिफ्टच्या डक मध्ये कोसळला. मात्र, डक मध्ये पाणी असल्याने बदलापूर अग्निशमन दलाला पचारण करण्यात आले. त्यानतर अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जाऊन या मजूराला डक मधून साचलेल्या पाण्यातून बाहेर काढले आहे.

मात्र, डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT