Akshay Shinde Encounter Saam TV
मुंबई/पुणे

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या एन्काउंटर थरार, मुंब्रा बायपासवर नेमकं काय घडलं? खळबळजनक माहिती समोर

Badlapur Akshay Shinde Encounter : पोलीस अक्षय शिंदे याला तळोजा जेलमधून बदलापूर क्राईम ब्रांन्चला घेऊन जात असताना रस्तात काय घडलं? त्याचा एन्काऊंटर नेमका कसा झाला? वाचा सविस्तर...

Satish Daud

संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी पोलीस चकमकीत मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेनं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. बदलापूर प्रकरणातील खरे आरोपी समोर येऊ नयेत म्हणून हा एन्काऊंटर झाला आहे का? असा सवाल विरोधी पक्षातील नेत्यांनी केला आहे. तर अक्षय शिंदे हा काही साधूसंत नव्हता. त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार केला. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या कारवाईत तो ठार झाला, असं सत्ताधाऱ्यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे अक्षय शिंदे याच्या आईनेही पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. माझा मुलगा हा रस्ता ओलांडतानाही हात पकडायचा, तो पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळीबार कसा करू शकतो. त्याला जाणून बुजून मारण्यात आलं आहे, असं अक्षय शिंदे याच्या आईने म्हटलं आहे.

दरम्यान, याप्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांच्या फेरी रंगत असताना एन्काऊंटरचा थरार समोर आला आहे. पोलीस अक्षय शिंदे याला तळोजा जेलमधून बदलापूर क्राईम ब्रांन्चला घेऊन जात असताना रस्तात काय घडलं? त्याचा एन्काऊंटर नेमका कसा झाला? अक्षयला ठार करणारे पोलीस अधिकारी कोण? याबाबत सविस्तर माहिती समोर आली आहे.

मुंब्रा बायपासवर अक्षय शिंदेचा एन्काऊंटर

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळच्या सुमारास पोलीस अक्षय शिंदेला तळोजा जेलमधून बदलापूर क्राईम ब्रान्चला घेऊन जात होते. त्यावेळी अक्षय शिंदेने एका पोलिसाची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळीबार केला. या झटापटीत एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागली. अक्षय पळून जाऊ स्वसंरक्षणार्थ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षयच्या दिशेने गोळीबार केला. तीन गोळ्या लागल्याने आरोपी गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर कोणी केला?

अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलीस निरीक्षकांचे नाव संजय शिंदे असं आहे. शिंदे यांनी यापूर्वी माजी पोलिस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे. त्याचबरोबर ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षातही शिंदे यांनी काम केले आहे. तत्कालीन आयपीएस प्रदीप शर्मा यांची मुंबई पोलिसांमध्ये एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी 300 हून अधिक गुन्हेगारांचा सामना केल्याचे सांगितले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : सर्व सरकारी बँका शनिवारी राहणार बंद; काय आहे व्हायरल सत्य? जाणून घ्या

Maharashtra Dry Day : महाराष्ट्रात उद्या ड्राय डे! किती वाजेपर्यंत दुकाने बंद राहणार? वाचा

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील दीड लाख राजपत्रित अधिकारी देणार एक दिवसाचे वेतन

Leftover Chapati Storage Tips: रात्री उरलेल्या चपात्या फ्रिजमध्ये ठेवाव्या की नाही? शिळ्या होऊ नये म्हणून 5 सोप्या टिप्स वापरा

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

SCROLL FOR NEXT