Bachchu Kadu Saam Tv
मुंबई/पुणे

जेव्हा बच्चू कडूंना चहाची तलप येते...टपरीवर घेतला चहा बिस्किटांचा आस्वाद

उद्या विधान परिषदेसाठी निवडणूक होणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकीची (Election) चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे राज्यात आमदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले जात आहे. तर दुसरीकडे राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांचा बिनधास्तपणे एका चहाच्या टपरीवर चहा घेत असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील बच्चू कडू हे आक्रमक मंत्री म्हणून ओळखले जातात. प्रशासकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी धारेवर धरलेले अनेकांनी पाहिले आहे, पण आज बच्चू कडू (Bachchu Kadu) निवांत एका चहाच्या टपरीवर चहा आणि बिस्कीटाचा आस्वाद घेतला आहे, त्यांच्या या साधेपणाची चर्चा चांगलीच रंगली आहे.

बच्चू कडू शेतकऱ्यांचे (Farmers)नेते आहेत. काही दिवसापूर्वी त्यांनी जळगावमध्ये एका वीज वितरण अधिकाऱ्याला जाब विचारला होता, या कॉलचे रेकॉर्डींग व्हायरल झाले होते. एका शेतकऱ्याने एमएसईबी विरोधात तक्रार केली होती. या संदर्भात बच्चू कडू यांनी संबंधित अधिकाऱ्याला सुनावले होते.

सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकीची चर्चा सुरु आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत लढत सुरु आहे. या निवडणुकीसाठी सर्व आमदार मुंबईत आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT