Uddhav Thackeray  saam tv
मुंबई/पुणे

Shirdi Lok Sabha Constituency News: शिर्डी लोकसभा मतदारसंघावरून मातोश्रीवर खडाजंगी, बबनराव घोलप की भाऊसाहेब वाकचौरे? उद्धव ठाकरेंसमोर पेच

Uddhav Thackeray Latest News: शिर्डी लोकसभा मतदारसंघावरून मातोश्रीवर खडाजंगी, बबनराव घोलप की भाऊसाहेब वाकचौरे? उद्धव ठाकरेंसमोर पेच

Satish Kengar

>> गिरीश कांबळे

Shirdi Lok Sabha Constituency News: उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर सर्व 48 जागांचा आढावा घेत आहेत. शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभा मतदारसंघनिहाय बैठकांचा धडाका सुरु आहे.

यातच आता शिर्डी लोकसभा मतदारसंघावरून मातोश्रीवर खडाजंगी सुरु आहे. शिर्डीमध्ये लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यावरून उद्धव ठाकरेंसमोर पेच निर्माण झाला आहे.

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध माजी आमदार मंत्री बबनराव घोलप यांच्यात जुंपण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांना उद्धव गटातून उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा सुरु आहे. या चर्चेनंतर माजी मंत्री बबनराव घोलप यांनी मातोश्रीवर धाव घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.  (Latest Marathi News)

मंत्री बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन वाकचौरेंच्या उमेदवारीला विरोध केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी पाच वेळा आमदार राहिलेल्या बबनराव घोलप यांना लोकसभेच्या उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते.

घोलप यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघात संपर्क प्रमुख नेमून नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या. मात्र उद्धव ठाकरे यांनी जुन्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन वाकचौरे यांच्या उमेदवारीवर चर्चा केली असल्याने बबनराव घोलप अस्वस्थ असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन घोलप यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुलुंड पोलिसांची मोठी कारवाई! केबल चोरी करणारी आंतरराज्य टोळीला ठोकल्या बेड्या

Congress MP: राजीनामा देण्याच्या २४ तासाच्या आत काँग्रेस खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश; राज्यातील राजकारणात खळबळ

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत कलह! भाजपने केसानं गळा कापला, शिंदेसेनेच्या आमदाराचा आरोप

Homemade Skin Tan Removal Tips: उन्हामुळे त्वचा काळी पडलीये? पार्लरला जाण्यापूर्वी 'हे' ५ घरगुती उपाय करा; चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो

Face Care: उन्हामुळे त्वचेची डल पडली आहे? घरी तयार केलेला हा फेस स्क्रब आठवड्यातून ३ वेळा नक्की वापरा

SCROLL FOR NEXT