बदलापूर जवळ दुचाकी आणि टेम्पोचा भीषण अपघात अजय दुधाणे
मुंबई/पुणे

बदलापूर जवळ दुचाकी आणि टेम्पोचा भीषण अपघात

दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू, तर एक गंभीर जखमी

अजय दुधाणे

बदलापूर : दुचाकी आणि टेम्पोचा भीषण Awful अपघात Accident होऊन, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू Death झाल्याची घटना बदलापूरमध्ये Badlapur घडली आहे. बदलापूरहून आंबेशिवकडे जाणाऱ्या रस्त्यावर एरंजाड गावाजवळ हा अपघात घडला आहे.

हे देखील पहा-

जयवंत वाळवी असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून, राजेश मुकणे हा तरुण या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. हे दोघे दुचाकीवर बदलापूरहून आंबेशिवकडे जात होते, तर टेम्पो बदलापूरकडे येत होता. एका अवघड वळणावर या दोन वाहनांचा अपघात होऊन, त्यात दुचाकीवरील दोघे खाली पडले. हा अपघात इतका भीषण होता, की यात दुचाकीवरील जयवंत वाळवी याचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर राजेश मुकणे हा गंभीर जखमी झाला आहे. या दोघांना उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला, असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत. या मार्गावर धोकादायक वळणांवर कोणतेही सूचना फलक नसल्याने घडलेल्या गंभीर अपघातानंतर धोकादायक वळणांवर सूचना फलक लावण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या आधी साताऱ्यात ठाकरे गटाला धक्का; बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

सुकन्या समृद्धी योजना, PPF मध्ये गुंतवणूक करताय? सरकारने जाहीर केले नवे व्याजदर, फायदा की झटका?

Maharashtra News Live Update: FIR मध्ये मिनाक्षी शिंदेंचं नाव टाका- संजय राऊत

Sambhajinagar : मराठवाड्याचं 'महाबळेश्वर'! निसर्ग सौंदर्याने नटलंय 'हे' थंड हवेचं ठिकाण

पितृपक्षात सोनं खरेदी करावे की नाही? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT