मराठी एकीकरण समितीच्या वतीने कल्याण स्टेशन बाहेर जनजागृती... प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

मराठी एकीकरण समितीच्या वतीने कल्याण स्टेशन बाहेर जनजागृती...

यावेळी कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष गणेश तिखंडे, विलास चव्हाण, भूषण पवार आणि प्रशांत कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रदीप भणगे

कल्याण - १४ सप्टेंबर निमित्ताने साजरा होणाऱ्या "हिंदी दिन" याला विरोध म्हणून मराठी एकीकरण समितीच्या कल्याण-डोंबिवली विभागाच्या वतीने निषेध करण्यात आला. तर हिंदी Hindi ही कायद्याने राष्ट्रभाषा National language नाही असे सांगत कल्याण स्टेशन बाहेर जनजागृती करण्यात आली. हिंदी भाषा दिन साजरा करून हिंदी भाषेला राष्ट्रीय भाषा मिळवून देण्याला विरोध म्हणून मराठी एकीकरण समितीने कल्याण रेल्वे स्थानक पश्चिम येथे "हिंदी लादणे थांबवा" तसेच "हिंदी ही राष्ट्रभाषा नाही" असे फलक घेऊन जनजागृती करत निषेध करण्यात आला. यावेळी कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष गणेश तिखंडे, विलास चव्हाण, भूषण पवार आणि प्रशांत कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील पहा -

मुळात शाळेतच मुलांना हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि ती प्रत्येक मुलाला आलीच पाहिजे अशी बीजे रेवून मराठी ह्या मातृभाषेला पर्यायी संस्कार बिंबवले जातात. कुठे तरी शाळेत हिंदी विषयी असलेली राष्ट्रभाषेची अफवा थांबली पाहिजे असे मत मराठी एकीकरण समितीचे कल्याण शहर समनव्यक भूषण पवार यांनी सांगितले.

तर भाषेचे महत्व जी महाराष्ट्राची राजभाषा आहे ते पटवून देण्यासाठी सदैव समितीकडून आम्ही झटत असतो. त्यामुळे हिंदी ही राष्ट्रभाषा नाही  पण मराठी ही राज्यभाषा आहे हे सांगण्याच्या दृष्टिकोनाने आज आम्ही हिंदी भाषे विषयी मराठी एकीकरण समितीतर्फे निषेध नोंदवत आहोत असे मत कल्याण डोंबिवली अध्यक्ष गणेश तिखंडे यांनी सांगितले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT