Alibaug, Rickshaw , Bike On Rent Saam Tv
मुंबई/पुणे

Bike On Rent ला रिक्षा चालकांचा विराेध, व्यवसाय बंद ठेवत अलिबाग पाेलीस ठाण्यावर काढला धडक माेर्चा

उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांनी अनधिकृत गाेष्टींना आळा घालावा अशी मागणी रिक्षा चालकांनी केली.

Siddharth Latkar

- सचिन कदम

Alibaug News : बाईक ऑन रेंट या व्यावसायाच्या (Bike On Rent In Alibaug) विरोधात आलिबाग येथील रिक्षाचालक आज (शनिवार) आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सर्व चालकांनी व्यवसाय बंद ठेवत पाेलीस ठाण्यावर धडक माेर्चा काढला. दरम्यान शहराील रिक्षा वाहतुक बंद राहिल्याने प्रवाशांचे हाल झाले. (Maharashtra News)

पर्यटनस्थळ असलेल्या अलिबाग येथे दुचाकी भाड्याने देण्याचा व्यवसाय जोरात सुरू आहे. या व्यवसायाला उपप्रादेशिक परिवहन विभागाची (RTO) कुठलीही परवानगी नाही. हा सर्व व्यवसाय बेकायदेशीर सुरु आहे असा दावा रिक्षा चालकांनी केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान अनधिकृता व्यावसायिकांना उपप्रादेशिक परिवहन विभागाने नोटीसा बजावल्याचे सांगितले जात आहे. तरीही हा व्यवसाय बिनदिक्कतपणे सुरू असल्याने त्या विरोधात रिक्षा चालकांनी आंदोलन छेडले आहे.

आज आलिबाग शहरातील जवळपास 350 रिक्षा चालकांनी रिक्षा वाहतुक बंद करुन आंदाेलनात सहभाग नाेंदविला आहे. बाईक ऑन रेंट मुळे रिक्षा व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. हा अनधिकृत व्यवसाय बंद झाला नाहीतर तीव्र आंदोलन (aandolan) छेडण्याचा इशारा रिक्षा चालकांनी प्रशासनास देखील दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT