Sridhar Patankar Saam Tv
मुंबई/पुणे

"कोणतीही कारवाई सूडबुद्धीने नाही, केंद्रीय यंत्रणा आपलं काम करतायत"

'भाजपच्या नेत्यांवर कारवाई झाली की कारवाई आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई झाली की सुडबुद्धीने कारवाई केली.'

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्यावरती आज (Sridhar Patankar) ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ सुरु झाली आहे. या कारवाईबाबत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) प्रतिक्रिया देताना पाटणकरांवरील कारवाई राजकीय दबावापोटी आणि सुडबुद्धीने केली असल्याचं म्हटंल आहे आणि त्यांच्या याच वक्तव्यावर भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

पहा व्हिडीओ -

ते म्हणाले, भाजपच्या नेत्यांवर कारवाई झाली की कारवाई आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई झाली की सुडबुद्धीने कारवाई केली म्हणायचे. मात्र, कुठलीही सूडबुद्धीने ही कारवाई केली जात नाही. केंद्रीय यंत्रणा (Central sSystem) आपले काम करत आहेत.

या उलट महाविकास आघाडीवाले स्वत: सुडबुद्दीने वागतात जेंव्हा जेंव्हा आमच्या नेत्यांवरती, कार्यकर्त्यांवरती आघाडी सरकारकडून कारवाई केली तेंव्हा प्रत्येकवेळी न्यायालयाने आम्हाला दिलासा दिला आहे. तसंच केंद्रीय यंत्रणा या कायद्यानेच वागत असतात असं भातकळकर म्हणाले. तसंच शरद पवारांनी (Sharad Pawar) तर नवाब मलिकांना अटक केल्यावर जाती धर्माताच रंग दिला तरी न्यायालयाकडून जे सत्य होत त्याद्वारे कारवाई करण्यात आली असल्याचं समोर आलं असल्याचं ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT