'ST कर्मचाऱ्यांना आत्तापर्यंत न भेटणारे मुख्यमंत्री तेलगणांच्या मुख्यमंत्र्यांना मात्र आवर्जून भेटतात' Saam TV
मुंबई/पुणे

'ST कर्मचाऱ्यांना आत्तापर्यंत न भेटणारे मुख्यमंत्री तेलगणांच्या मुख्यमंत्र्यांना मात्र आवर्जून भेटतात'

'आजची भेट म्हणजे तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये जास्त दिवस घरात कोण बसुन राहत याची चाचपणी '

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट म्हणजे दोघांमध्ये जास्त दिवस घरात कोण बसुन राहत याची चाचपणी असल्याची खोचक टीका भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी लगावला आहे. भाजपविरोधात तिसऱ्या आघाडीसाठी सध्या सर्वच विरोधीपक्षांचे प्रयत्न सुरु असून यी पार्श्वभूमीवरच तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली.

आणि त्यांच्या या भेटीवरच आता भाजपकडून (BJP) टीका केली जात आहे. भाजप नेते अतुल भातखळकर म्हणाले, 'तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट म्हणजे दोघांमध्ये जास्त दिवस घरात कोण बसुन राहत याची चाचपणी सुरु आहे. फोटो इव्हेंट आणि राजकीय नौटंकी एवढाच याचा अर्थ असल्याची टीका त्यांनी आजच्या भेटीवर केली आहे.

तसंच या भेटीसाठी सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांची परवानगी घेतली होती का ? असा प्रश्न विचारत त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला बाहेर न पडणारे, ST कर्मचाऱ्यांना आजवर न भेटणारे मुख्यमंत्री तेलगणांच्या मुख्यमंत्र्यांना मात्र आवर्जून भेटतात आणि यावरुनच महाराष्ट्राच्या राजकारणाची दयनीय अवस्था सिद्ध होतेय असही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

SCROLL FOR NEXT