Pune Railway News Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: पुणेकरांनो लक्ष द्या! रविवारी अनेक रेल्वे गाड्या रद्द, कोणत्या ट्रेन धावणार नाहीत; जाणून घ्या...

Pune Railway News: पुणेकरांनो लक्ष द्या! रविवारी अनेक रेल्वे गाड्या रद्द, कोणत्या ट्रेन धावणार नाहीत; जाणून घ्या...

साम टिव्ही ब्युरो

Pune Railway News: पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. रविवारी पुण्यातून सुटणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. चिंचवड ते खडकी स्टेशन दरम्यान सुरू असलेल्या तांत्रिक कामांसाठी रविवारी लोकल रेल्वे गाड्या बंद राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्थानकातून लोणावळ्याच्या दिशेने जाणाऱ्या १२ गाड्या, तर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या १२ गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

'या' गाड्या झाल्या रद्द

पुणे स्थानकातून सुटणाऱ्या लोकल आणि एक्सप्रेस ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे - लोणावळा, पुणे - तळेगाव डेक्कन एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस देखील रविवारी धावणार नाहीत. (Latest Marathi News)

मध्य रेल्वेवर शनिवार-रविवार विशेष पॉवर ब्लॉक

दरम्यान, मध्य रेल्वेच्या नाहूर आणि मुलुंडदरम्यान विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. येत्या शनिवार-रविवारी म्हणजे १९-२० तारखेला हा विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. नाहूर ते मुलुंड दरम्यान 2 गर्डर लॉन्च करण्यासाठी वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

नाहूर आणि मुलुंड दरम्यान विंच आणि पुली पद्धतीने 2 गर्डर लॉन्च करण्यासाठी मध्य रेल्वे सर्व 6 मार्गांवर वाहतूक आणि पॉवर ब्लॉक चालवेल. सध्या नाहूर आणि मुलुंड दरम्यानचा सध्याचा रोड ओव्हर ब्रिज (ROB) उड्डाणपूल वाढलेल्या रस्त्यावरील वाहनांची वाहतूक हाताळण्यासाठी अपुरा आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या या ROBचे विविध ब्लॉक घेऊन रुंदीकरण करण्याचे नियोजन आहे. एकूण 14 गर्डर्स भविष्यात सुरू करण्याचे नियोजित आहे, त्यापैकी 2 गर्डर्सचा पहिला ब्लॉक 19/20 ऑगस्टच्या शनिवार/रविवारी रात्री सुरू करण्याचे नियोजित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरून वाद, दुकान चालकाला टोळक्याकडून बेदम मारहाण

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT