Antop Hill Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: तरुणाची हत्या करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न

अँटॉप हिल पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

सुरज सावंत

मुंबई - अँटॉप हिल (Antop Hill) परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाची हत्याकरून त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रविवारी मध्यरात्री हा गुन्हा घडला असून सोमवारी गुन्हा दाखल करून पोलिसांनी (Police) तपासाल सुरूवात केली. अब्दुल सलाम मुनावर अली सय्यद (२९) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अब्दुल याला काही जणांनी केंद्रीय लोक निर्माण विभागाच्या गोडाऊन मागे सेक्टर १ येथे बोलावले होते.

हे देखील पहा -

तो तिथे गेला असता त्याठिकाणी त्याला जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.अज्ञात आरोपींने एवढ्यावरच न थांबता अब्दुलला ज्वलनशील पदार्थाने जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपीनी पळ काढला या प्रकरणी अँटॉप हिल पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart blockage: हार्ट ब्लॉकेज असल्यास शरीरात दिसतात हे ६ मोठे बदल

मेट्रो अधिकाऱ्याच्या कृत्याने मुंबई हादरली; इंजिनीअर असलेल्या महिलेवर ऑफिसमध्येच अत्याचार

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

ठाणे हादरलं! गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला संपवलं, नंतर मृतदेह हिरव्या ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

CNG, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढणार?

SCROLL FOR NEXT