Ulhasnagar News  Saam TV
मुंबई/पुणे

Ulhasnagar News : उल्हासनगर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर जादूटोणा करण्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद

Ulhasnagar Crime News :याप्रकरणी पालिकेच्या चार्जिंग स्टेशनवरील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

अजय दुधाणे

Kalyan News :

उल्हासनगर महापालिकेचे सहायक आयुक्त यांच्यावर जादूटोणा करण्यासाठी त्यांच्या कारच्या चाकाखाली लिंबू ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पालिकेच्या चार्जिंग स्टेशनवरील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

उल्हासनगर महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त सामान्य प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्यपदी कार्यरत असलेले मनीष हिवरे यांच्यावर जादूटोणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

उल्हासनगर महापालिका मुख्यालयाच्या मागे असलेल्या महापालिकेच्या चार्जिंग स्टेशनसमोर त्यांची कार उभी होती. ११ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता हिवरे हे चार्जिंग स्टेशनजवळील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यालयात बसले असता त्यांच्या कारच्या चाकाखाली लिंबू ठेवण्यात आल्याची माहिती कर्मचाऱ्याने दिली.

१२ तारखेला सीसीटीव्ही तपासले असता नागरी सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्याने हे कृत्य केले असल्याचे दिसले. हिवरे यांनी हा प्रकार आयुक्त अजिज शेख यांना सांगितल्यावर शेख यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याच्या सूचना दिल्या. (Crime News)

त्यानंतर हिवरे यांनी मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली. महापालिका कर्मचाऱ्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाणे अधिक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर ठणठणाट; डिझेल तुटवड्यानं शेतकऱी मोठ्या संकटात

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणातील पालकांवर सीबीआयचे लक्ष

Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदे ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत? खासदार थेट शिंदेसेनेच्या व्यासपीठावर

Pasta Recipe: हॉटेलमध्ये ३०० रुपयांना मिळणारा पास्ता १० मिनिटांत बनवा घरीच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंवर सोपवली मोठी जबाबदारी; विदर्भात भाजपचं टेन्शन वाढणार?

SCROLL FOR NEXT