Kandivali Police staion Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: ATM कॅश व्हॅन लुटून आरोपींचा पोबारा; 10 वर्षांपासून दोघांना पोलिसांकडून बेड्या

Mumbai Crime News: लीडअभावी हा खटला 10 वर्षांपूर्वी बंद करण्यात आला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

Mumbai Crime News: एटीएम कॅश व्हॅन लुटणाऱ्या व 10 वर्षांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना मुंबईतील कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. दोघे 2012 मध्ये एटीएम कॅश व्हॅनमधून सुमारे 80 लाख रुपये लुटून फरार झाले होते.

लीडअभावी हा खटला 10 वर्षांपूर्वी बंद करण्यात आला होता. मात्र कांदिवली पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोडेखोरांची माहिती मिळाल्याने ते पोलिसांच्या हाती लागले. (Crime News)

कांदिवली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सूत्रांच्या मदतीने दोन्ही आरोपींचा तपास सुरू केला. आरोपी अरुण सहदेव वाघमारे (38) याला सांगली विश्रामबाग येथून तर सतीश संभाजी आगडे (38) याला लातूर साई गावातून अटक करण्यात आली. हे दोन्ही आरोपी दहिसर पश्चिम कांदरपाडा येथे राहत होते. (Latest Marathi News)

हे दोन्ही आरोपी रायटर एटीएम कॅश डिपॉझिट व्हॅनमध्ये चालक म्हणून काम करायचे. या दोन्ही आरोपींनी 2012 सालची सीएएस व्हॅन लुटली आणि त्यात ठेवलेले पैसे घेऊन कांदिवली पश्चिम एमजी रोड येथे व्हॅन सोडून पळ काढला. आरोपींनी लुटलेली रक्कम कोठे वापरली याचा तपास सध्या कांदिवली पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: इकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, तिकडे मुख्यमंत्र्यांचं ठाकरेंच्या आमदाराला 'प्रपोजल'; फडणवीसांच्या विधानाने खळबळ

तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका सुरूच; आता पुण्यात FDA ने टाकली धाड

Sunday Horoscope : पार्टनर साथ देईल, लाईफस्टाईल बदलेल; ५ राशींच्या लोकांच्या जीवनातील समस्या क्षणात होतील दूर

MBBS प्रवेशाच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा, बोगस अॅडमिशनच्या रॅकेटचा पर्दाफाश

Operation Tiger : ऑपरेशन टायगरचा मुहूर्त ठरला? महाराष्ट्रातील २ नेत्यांनी थेट एकनाथ शिंदेंचं नाव घेतलं, नेमकी वेळही सांगितली

SCROLL FOR NEXT