चाकण ग्रामीण रुग्णालयातील परिचारिकेवर प्राणघातक हल्ला रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

चाकण ग्रामीण रुग्णालयातील परिचारिकेवर प्राणघातक हल्ला

चाकण ग्रामीण रुग्णालय परिसरातील निवासस्थानातच नर्सवर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे.

रोहिदास गाडगे

पुणे: चाकण ग्रामीण रुग्णालय परिसरातील निवासस्थानातच नर्सवर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. नर्सच्या गळ्यावर, तोंड आणि हातावर धारदार केला चाकुने हल्ला केल्याने नर्स गंभीर जखमी झाली आहे. तीच्यावर चाकण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. वंदना ढाक-लांडगे असे हल्ला झालेल्या नर्सचे नाव आहे.

चाकण रुग्णालयात कार्यरत असणारी परिचारिका दुपारच्या सुमारास रुग्नालयात परिसरातील निवासस्थानात होती. याच दरम्यान एक अनोळखी महिला घरी आली यावेळी या अनोळखी महिलेने आपली ओळख सांगत मी तुमच्या पतीच्या ओळखीचे आहे. असे सांगत घरात प्रवेश केला चर्चा सुरु असताना परिचारिका वंदना ढाक-लांडगे या पाणी देण्यासाठी किचनमध्ये गेली याचाच फायदा घेत या महिलेने धारदार चाकुने वंदना यांच्यावर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात वंदना ढाक-लांडगे गंभीर जखमी झाल्या असुन त्यांना तात्काळ चाकण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चाकण ग्रामीण रुग्नालय परिसरातील निवासस्थानात परिचारिकेवर हल्ला झाल्याने परिसरात खळबळ पसरली आहे मात्र या अनोळखी महिलेने हल्ला का केला याबाबत अजुन स्पष्टता झाली नसुन चाकण पोलीसांनी हल्ला करणा-या महिलेला ताब्यात घेतले आहे चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Motichoor Laduu Recipe: दिवाळीला घरच्या घरी बनवा बाजारासारखे दाणेदार आणि स्वादिष्ट मोतीचूर लाडू; वाचा सोपी रेसिपी

२० दिवस वैद्यकीय रजा अन् तेलंगणात अटक! पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याच्या कारनाम्याने खळबळ

Maharashtra News Live Update: ठाण्याहून उपनगरात जाणारी रेल्वेसेवा आता पूर्व पदावर येण्यास सुरुवात

Ghee on Empty Stomach: रोज सकाळी रिकाम्या पोटी तूप खावे का? जाणून घ्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

Former Education Minister Arrested: १०० कोटींचा शालेय घोटाळा; माजी शिक्षणमंत्र्याला अटक, तमिळनाडूच्या राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT