Ashish Shelar Saam Tv
मुंबई/पुणे

Ashish Shelar: मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी....! शेलारांच खोचक ट्विट

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीकरिता अधिकाऱ्यांनी नेल्याची माहिती समोर आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीकरिता अधिकाऱ्यांनी नेल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आले आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणामध्ये ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीने समन्स पाठविण्यात आले होते. (ashish shelar taunts nawab malik over ed inquiry Tweet)

हे देखील पहा-

मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी....! असे म्हणताना, ज्याने खीर खाल्ली नाही, त्याने घाबरण्याचे कारण नाही. पण ज्याने ज्याने खीर खाल्ली त्याने त्याने किती ही चेहरा भोळा भाबडा केला, कांगावा केला, तरी घागर बुडणारच! असे खोचक ट्विट आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी यावेळी केले आहे. ईडी अधिकाऱ्यांचे एक पथक आज सकाळी ५ वाजेच्या सुमारास नवाब मलिक यांच्या निवासस्थानी दाखल करण्यात आले होते.

यानंतर जवळपास ३ तास चर्चा सुरू होती. यानंतर सकाळी ७ वाजेच्या सुमारास नवाब मलिक यांनी स्वत: हून ईडी कार्यालयात चौकशीसाठी येत असल्याचे सांगितले आहे, आणि त्यानंतर ते ईडी अधिकाऱ्यांसोबत कार्यालयात दाखल झाले अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची ईडीकडून (ED) चौकशी करण्यात येत आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money laundering case) ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. ईडीच्या कोठडीमध्ये असलेला दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकरने (Ibrahim Kaskar) नवाब मलिक यांचे नाव घेतल्याची शक्यता वर्तवली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणी शहरातील विविध भागात ATS पथकांची धाड

सोलापूर हादरले! प्रपोज नाकारल्याचा राग, महिलेच्या लग्नानंतर अवघ्या २ महिन्यांत पतीचा खून, कोयत्याने सपासप वार

Gold Rate Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 24K, 22K, 18K सोन्याचे दर वाढले, पाहा आजचे भाव

Diabetes Recipe : मधुमेहाच्या रुग्णांनी 'ही' चटपटीत चटणी एकदा खाऊन तर पाहा, चवीला भारी अन् आरोग्याला फायदेशीर

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची ₹51000 बेसिक सॅलरी होणार, आठव्या वेतन आयोगाची नवी मागणी आली समोर

SCROLL FOR NEXT