Asha Worker Strike: Palghar Zilla Parishad Officers and Employees Took Parenthood of to Malnutritioned Kids saam tv
मुंबई/पुणे

Asha Worker Strike: अंगणवाडी सेविकांपाठाेपाठ आशा वर्कर संपावर, कुपाेषण राेखण्यासाठी पालघर जिप अधिकारी-कर्मचारी सरसावले

Asha Worker Strike: या उपक्रमामुळे निश्चितच कुपोषणाची संख्या घटेल असा विश्वास व्यक्त होत आहे.

रुपेश पाटील

Palghar News:

राज्यात अंगणवाडी सेविकांचा संप (anganwadi sevika strike) सुरू असून आजपासून (शुक्रवार) आशा वर्कर (asha worker) देखील संपावर जाणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात विशेषतः पालघर सारख्या कुपोषणाचा आकडा मोठा असलेला जिल्ह्यात पुन्हा एकदा कुपोषण वाढीची भीती व्यक्त हाेऊ लागली आहे. (Maharashtra News)

दरम्यान या संप काळात पालघर जिल्ह्यातील तीव्र कुपोषित आणि अति तीव्र कुपोषित बालकांना पालघर जिल्हा परिषदेचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून दत्तक घेतले जाणार आहे. याबाबतची माहिती पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

निकम म्हणाले संप सुरू असेपर्यंत पालघर जिल्ह्यातील तीव्र कुपोषित आणि अति तीव्र कुपोषित बालकांचे पालकत्व जिल्हा परिषदेच्या कर्मचारी आणि अधिकारी यांनी स्वीकारले आहे. पालकत्व स्वीकारलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून या कुपोषित बालकांच नीट संगोपन होतं की नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक तालुक्यात आरोग्य विभागाचे कर्मचारी निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पालघर जिल्ह्यात आधीच उपोषणाचा आकडा मोठा असताना या संपामुळे पुन्हा एकदा यात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने पालघर जिल्हा परिषदेने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे निश्चितच कुपोषणाची संख्या घटेल असा विश्वास व्यक्त होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला; सर्वाधिक स्वस्त पेट्रोल कोणत्या जिल्ह्यात?

Dr.Anand Nadkarni : प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन

Diabetes Control Sugar Free Drink: डायबिटीजसाठी 'हे' 5 ड्रिंक्स आहेत वरदान; रक्तातील साखर वाढणार नाही

Maharashtra News Live Update: खासदार मेधा कुलकर्णी इलेक्ट्रिक वाहनाने विधान भवनात दाखल

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

SCROLL FOR NEXT